ETV Bharat / state

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष झालेल्या राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास... - congress

राहुल नार्वेकर हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली. यापूर्वी ते शिवसेना पक्षाचे सदस्य होते. आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया झाली. यात भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली आहे.

Rahul Narvekar
भाजपाकडून युवा आमदार राहुल नार्वेकरांना उमेदवारी
author img

By

Published : Jul 2, 2022, 4:31 PM IST

Updated : Jul 3, 2022, 12:19 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री ( DCM Devendra Fadnavis ) पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा अखेर झाला आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया झाली. त्यासाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांची निव़ड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

कोण आहेत राहुल नार्वेकर? - राहुल नार्वेकर हे भाजपचे आमदार आहेत. तसेच, ते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावाई आहेत. राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा परिसरात नगरसेवक होते. राहुल नार्वेकर पूर्वी शिवसेनेत होते. मात्र, 2014 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारले. त्यानंतर ते शिवसेनेतून बाहेर पडले होते.

राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास - राहुल नार्वेकर हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली. यापूर्वी ते शिवसेना पक्षाचे सदस्य होते, परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि मावळ मतदारसंघातून पक्षाच्या तिकिटावर लोकसभा लढवली. राहुल हे भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

हेही वाचा - मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद - संजय राऊत

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी उलथापालथ झाली असताना एकामागून एक धक्के सुरूच आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असा सर्वांचाच कयास असताना एकनाथ शिंदेंच्या गळ्यात ती माळ घालून फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद घेण्यास भाग पाडले आहे. यातच आज शिवसेनेचेच एकेकाळचे खंदे नेते राहुल नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवार केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज त्यांनी अर्ज दाखल केला.

भाजपाकडून राधाकृष्ण विखेपाटील यांचे नाव चर्चेत होते? एकनाथ शिंदे बंडखोर गट व भाजप यांचे नवीन सरकार स्थापन झाले असताना आता विधानसभा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजप कडून वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या नावावर जवळपास शिकामोर्तब झाले असताना आता अचानक आमदार राहुल नार्वेकर यांनी भाजप कडून विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी त्यांच्या सोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन हे नेते उपस्थित होते.

राहुल नार्वेकर हे शिवसेनेत होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. असे असताना त्यांचे सासरे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. रामराजे नाईक निंबाळकर हे सभापती आहेत. सध्या ते भाजपात असून विधान परिषदेवर पुन्हा निवडून आले आहेत.

२ दिवसाचे विशेष अधिवेशन? महाराष्ट्र विधानसभेचे ३ जुलैपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. यानंतर ते भाजपात गेले होते.

सासरे सभापती तर जावई विधानसभा अध्यक्ष, दुर्मिळ योग? - नार्वेकरांचे सासरे रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत. सातारा जिल्ह्यातील निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे २९ वे वंशज आहेत. ते १९९५ साली सर्वप्रथम फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी निंबाळकरांनी २२ अपक्षांना एकत्र करत तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारला पाठिंबा दिला होता. युती सरकारच्या त्या राजवटीमध्ये निंबाळकर हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते. आता जावई राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यास रामराजे निंबाळकर हे परिषदेचे सभापती तर राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष असा दुर्मिळ योग महाराष्ट्राला पहायला भेटणार आहे?.

हेही वाचा - मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात रात्री उशिरा मंत्रिमंडळ खातेवाटपाबाबत चर्चा

Last Updated : Jul 3, 2022, 12:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.