ETV Bharat / state

'कर्जमाफी ही अकबराच्या न शिजणाऱ्या बिर्याणीसारखी' - कर्जमाफी बिर्याणीसारखी

विदर्भाला आजोळ म्हटले आणि आजोळी आलेल्या नातवाच्या सरकारने टोप्याच लावल्या. ना कोणती ही नवी घोषणा केली. ना महिला सुरक्षेसाठी काही दिले, ना नवा प्रकल्प दिला.

Ashish Shelar
Ashish Shelar
author img

By

Published : Dec 21, 2019, 8:06 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधासभेमध्ये शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. याद्वारे शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या या कर्जमाफीवर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी ही अकबराच्या न शिजणाऱ्या (खिचडी) बिर्याणीसारखी असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - एवढ्या कर्जमाफीवरच थांबणार नाही, शेतकरी चिंतामुक्त करणार - मुख्यमंत्री

30 सप्टेंबरपर्यंत कर्जमाफी दिल्याने ऑक्टोबर आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही, शिवाय शेतकऱ्यांच्या हेक्टरी 25 हजार रुपये मदतीबाबत ते काही बोलायलाच तयार नाहीत. विदर्भाला आजोळ म्हटले आणि आजोळी आलेल्या नातवाच्या सरकारने टोप्याच लावल्या. ना कोणती ही नवी घोषणा केली. ना महिला सुरक्षेसाठी काही दिले, ना नवा प्रकल्प दिला. पहिल्याच वेळी आजोळी आलेला नातू केवळ भावनिक भाषण करून चालला गेला, असेही शेलार म्हणाले.

हेही वाचा - सरसकट कर्माफीचे काय झाले? सरकारला सवाल करत विरोधकांचा सभात्याग

चहापानाला राजशिष्टाचार मोडून राज्यपालांच्या नंतर पोहचणं, विधानसभा विरोधी पक्षनेत्यांच्या पहिल्या भाषणाला उशिरा पोहचणं, विधानपरिषद विरोधी पक्षनेत्यांच्या अभिनंदनाला उपस्थित न राहणं, विधानसभा अध्यक्षांनी छायाचित्रासाठी दिलेली वेळ न पाळनं, याला मुख्यमंत्र्यांचा अहंकार म्हणायचे का? असा सवालही त्यांनी ट्विटरवरून केला आहे.

दरम्यान, कर्जमाफीच्या प्रक्रियेची सुरुवात मार्चपासून होईल. कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी १५ दिवसात योजना जाहीर केली जाईल, असे सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Intro:Body:

'कर्जमाफी ही अकबराच्या न शिजणाऱ्या बिर्याणीसारखी'

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधासभेमध्ये शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. याद्वारे शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या या कर्जमाफीवर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी  ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी ही अकबराच्या न शिजणाऱ्या (खिचडी) बिर्याणीसारखी असल्याचे म्हटले आहे.

30 सप्टेंबरपर्यंत कर्जमाफी दिल्याने आक्टोबर आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही, शिवाय शेतकऱ्यांच्या हेक्टरी 25 हजार रुपये मदतीबाबत ते काही बोलायलाच तयार नाहीत. विदर्भाला आजोळ म्हटले आणि आजोळी आलेल्या नातवाच्या सरकारने टोप्याच लावल्या. ना कोणती ही नवी घोषणा केली. ना महिला सुरक्षेसाठी काही दिले, ना नवा प्रकल्प दिला... पहिल्याच वेळी आजोळी आलेला नातू केवळ भावनिक भाषण करुन चालला गेला, असेही शेलार म्हणाले.

चहापानाला राजशिष्टाचार मोडून राज्यपालांच्या नंतर पोहचणं, विधानसभा विरोधी पक्षनेत्यांच्या पहिल्या भाषणाला उशिरा पोहचणं, विधानपरिषद विरोधी पक्षनेत्यांच्या अभिनंदनाला उपस्थितीत न राहणं, विधानसभा अध्यक्षांनी छायाचित्रासाठी दिलेली वेळ न पाळनं, याला मुख्यमंत्र्यांचा अहंकार म्हणायचे का? असा सवालही त्यांनी ट्विटरवरून केला आहे.

शेतकऱ्यांसाठी आता स्वतःच कशा फुटपट्या लावायला सुरुवात केली आहे.. ना अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये दिले, ना सातबारा कोरा केला, सरसकट कर्जमाफी नाहीच, जी घोषणा केली ती पण फूटपट्ट्यांचीच. अवकाळीने धानच गेलं, हे सरकार म्हणे धानाला बोनस देऊ, असे ते म्हणाले.

दरम्यान, कर्जमाफीच्या प्रक्रियेची सुरुवात मार्चपासून होईल. कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी १५ दिवसात योजना जाहीर केली जाईल, असे सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.