ETV Bharat / state

रमजान महिन्यात भाजप अल्पसंख्याक सेल लोकांना घरपोच देणार फळे

देशभर कोरोनाचे संकट उभे राहिले असून याचा प्रसार रोखण्यासाठी 3 मेपर्यंत देश लॉकडॉऊन असून आजपासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असला तरी नागरिकांनी फळ खरेदी करण्यासाठी घराच्या बाहेर पडू नये यासाठी पवई अल्पसंख्याक सेल भाजपने या महिन्यात मुस्लिम बांधवांना 'डोअर टू डोअर' फळे सवलतीत उपलब्ध करून देणार आहेत.

author img

By

Published : Apr 25, 2020, 5:56 PM IST

रमजान महिन्यात भाजप अल्पसंख्याक सेल लोकांना घरपोच देणार फळे
रमजान महिन्यात भाजप अल्पसंख्याक सेल लोकांना घरपोच देणार फळे

मुंबई - पवई परिसरात रमजान महिन्यात भाजप अल्पसंख्याक सेल लोकांना फळे घरपोच सवलतीत देणार आहे. देशभर कोरोनाचे संकट उभे राहिले असून याचा प्रसार रोखण्यासाठी 3 मेपर्यंत देश लॉकडॉऊन असून आजपासून मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असला तरी नागरिकांनी फळ खरेदी करण्यासाठी घराच्या बाहेर पडू नये, यासाठी पवईत अल्पसंख्याक सेल भाजपने या महिन्यात मुस्लिम बांधवांना 'डोअर टू डोअर' फळे सवलतीत उपलब्ध करून देणार आहेत.

कोरोना विषाणुचा संसर्ग मुंबईत मोठ्या प्रमाणात पसरला असून रोज वाढणारे रुग्णाचे आकडे मुंबईकरांना चिंतेत टाकत आहेत. लॉकडॉऊनमध्ये धार्मिक, सामाजिक व खासगी कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली आहे. पवित्र रमजान सणात उपवासानंतर फळांना अधिक महत्त्व असते. सामाजिक अंतर मुंबईत ठेवणे शक्य होत नसल्याने फळ मार्केट बंद झाले आहेत. पवई परिसरामध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून सध्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

परिसरातील मुस्लीम समाजातील उपवास पकडणाऱ्या लोकांना कोणताही त्रास होऊ नये. ते फळासाठी घराबाहेर पडू नये म्हणून पवई भाजप अल्पसंख्याक सेलने शेतकऱ्याकडून सवलतीमध्ये टरबूज, केळी, द्राक्षे, पपई, खरबूज आदी फळांची खरेदी केली असून ते कमी सवलतीत लोकांना त्यांच्या दारावर जाऊन देणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.