मुंबई - महापालिकेत आता भाजप विरोधी बाकांवर बसणार आहे. तर २०२२ ला मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल, असे वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी केले आहे. आज मुंबई सर्व आमदार आणि नगरसेवक यांची बैठक झाली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मुंबई महापालिकेत असलेली शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. आता एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजप भूमिका निभावणार आहे. ही भूमिका मुंबई पालिकेसह इतर पालिकेत सुद्धा असणार आहे, असे राम कदम यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आमदार व नगरसेवकांना कामाला लागण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.