ETV Bharat / state

भाजपची नवी कार्यकारिणी जुलैमध्ये जाहीर होण्याची शक्यता; नाराज नेत्यांना मिळणार का संधी?

author img

By

Published : Jun 22, 2020, 2:41 PM IST

जुलै महिन्यात भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये पक्षातील नाराज नेत्यांचे पुनर्वसन कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

bjp latest  News
भाजप लेटेस्ट न्यूज

मुंबई- भाजपची नवीन कार्यकारणी पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.यात पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या एकनाथ खडसे,पंकजा मुंडे, राम शिंदे, बबनराव लोणीकर, प्रकाश मेहता आणि विनोद तावडे यांना पक्ष कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, राम शिंदे, बबनराव लोणीकर, प्रकाश मेहता आणि विनोद तावडे यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाकडून वगळण्यात आले त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे.

पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच नाव न त्यांनी निशाणा साधला होता.तसेच विधान परिषदेवर ही खडसे यांनी डावलले गेले. तावडे यांचे तिकीट नाकारून सुनील राणे यांना बोरिवली मधून तिकीट दिले तर चंद्रशेखर बावनकुळे यांचे ही तिकीट कापण्यात आले होते. या नेत्यांची नाराजी असताना त्यांचे कसे पुनर्वसन करणार हा मोठा प्रश्न भाजपात असून त्यांना कोणती संधी पुढील काळात भाजपकडून मिळते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१४ ते २०१९ या काळात कोथरुड विधानसभेच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर कुलकर्णी यांनी जाहीरपणे पाठीत खंजीर खूपसला असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते.त्यामुळे त्यांना कार्यकारणीत मोठे स्थान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.पण इतर नाराज आणि वगळलेल्या नेत्यांचे भाजप काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून गेल्या फेब्रवारी महिन्यात नवी मुंबईत चंद्रकांत पाटील यांची पुन्हा निवड करण्यात आली. त्यानंतर कार्यकारिणीतील इतर पदांची देखील घोषणा अपेक्षित होती. परंतु राज्यात गेल्या काही महिन्यात असलेल्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे जुलै महिन्यात कार्यकारणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीत वगळलेल्या आणि पराभव झालेल्या निष्ठावंत भाजप नेत्यांची कार्यकारिणीवर व महामंत्री पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

डझनभर आमदार आणि नेते फुटणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यात होती. त्यावर भाजपने स्पष्ट शब्दांत चर्चा फेटाळून लावली होती. 'भाजपचा एकही आमदार आणि नेता फुटणार नाही. उलट महाविकास आघाडीच्या आमदारांमध्येच अस्वस्थता असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्या भीतीतून अशा अफवा पसरवल्या जात असून या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत,' असा पलटवार भाजप कडून करण्यात आला होता.आता पुढील काळात भाजपची नवीन कार्यकारणी जाहीर होणार असल्याचे कळते आहे. त्यामध्ये भाजप माजी आमदार आणि नेते यांची उघड नाराजी दूर करण्यासाठी त्यांना आता कोणती जबाबदारी देते हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.