ETV Bharat / state

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 'बालहट्ट' नाही हे दाखविण्याचा प्रयत्न म्हणजे फार्स - तावडे

मुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा कुलगुरुंची बैठक झाली होती, त्या बैठकीत कुलगुरुंनी परीक्षा न घेण्याला विरोधच केला होता. त्याउपर परीक्षा घ्यायच्या नाहीत, असा शासन आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढला. यात एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचे काय? हा विचार केलाच गेला नव्हता. तर त्याबाबत काय करायचे याचा विचार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरुंची बैठक झाली. ती बैठक परीक्षा न घेण्या बाबतचा जो शासन निर्णय आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी होती, असा आरोपही त्यांनी केला.

bjp leader vinod tawade news
परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 'बालहट्ट' नाही हे दाखविण्याचा प्रयत्न म्हणजे फार्स - तावडे
author img

By

Published : Jul 10, 2020, 7:58 AM IST

Updated : Jul 10, 2020, 2:29 PM IST

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे नसून कुलगुरुंच्या आग्रहाखातर आहे, असे दाखविण्याचा फार्स आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. या पत्रकार परिषदेनंतर परीक्षा होणार का नाही? एटीकेटी विद्यार्थ्यांचे काय होणार? याबाबत कोणतीच स्पष्टता विद्यार्थ्यांना आली नाही. उलट मंत्र्यांनी अजूनच गोंधळात भर टाकली, अशी टीका करत भाजप नेते व माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी परीक्षा रद्द करण्याच्या प्रकरणावरून सामंत यांच्यावर निशाणा साधला.

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 'बालहट्ट' नाही
तावडे म्हणाले की, कुलगुरुंनी परीक्षा घेता येणार नाही, अशी कथित वक्तव्ये केल्याचे पत्रकार परिषदेतून दाखवण्याचे काम उदय सामंत यांनी आज(गुरुवारी) केले. मुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा कुलगुरुंची बैठक झाली होती, त्या बैठकीत कुलगुरुंनी परीक्षा न घेण्याला विरोधच केला होता. त्याउपर परीक्षा घ्यायच्या नाहीत, असा शासन आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढला. यात एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचे काय? हा विचार केलाच गेला नव्हता. तर त्याबाबत काय करायचे याचा विचार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरुंची बैठक झाली. ती बैठक परीक्षा न घेण्या बाबतचा जो शासन निर्णय आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी होती, असा आरोपही त्यांनी केला.

हा तर कुलगुरुंचा अपमान-

कुलगुंरूच्या बैठकीला मंत्री उपस्थित नाहीत अशा बैठकीचे निवडक चित्रीकरण त्या-त्या कुलगुरुंची परवानगी न घेता माध्यमांच्यासमोर व जनतेसमोर आणणे हा कुलगुरुंचा अपमानच आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी कुलगुरुंना अशापध्दतीने वापरणे हे दुदैर्वी आणि संतापजनक आहे. कुलगुरुंची ही बैठक यूजीसीची नवीन मार्गदर्शक तत्वं येण्याआधीची होती. नवीन मार्गदर्शक तत्व आल्यानंतर कुलगुरुंना काय म्हणायचं आहे, ते माननीय कुलपतींनी ऐकून घ्यावे, अशी आमची मागणी असेही तावडे म्हणाले

पुढे बोलताना तावडे म्हणाले, यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार गुणवत्तेला धरुन जर निर्णय झाला नाही, तर देशात आणि जगात महाराष्ट्रातील या पदवीधरांचा पुढील शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. तसेच जे विद्यार्थी ज्या विषयात नापास आहेत, त्या विषयाची परीक्षा न घेता त्याला ज्या विषयात पास झाला आहे. त्यातील सर्वसाधारण गुणांच्या आधारे त्याला मार्क द्यावेत, असे केल्यास अशा पदवीधराला बेरोजगारीच्या खाईत लोटले जाईल. अशी भीती त्यांनी उपस्थित केली.

महाराष्ट्र शासनाने प्रथम द्वितीय वर्षाच्या मुलांच्या परीक्षा घ्यायच्या नाहीत आणि तृतीय वर्षाच्या मुलांच्या परीक्षा घ्यायच्या, असा निर्णय घेतला होता. पण आदित्य ठाकरेंच्या हट्टापायी तो निर्णय दोन दिवसात मंत्रिमहोयांनी बदलला. याबाबत मंत्री महोदयांचा मुळात यूजीसीशी समन्वय हा विद्यापीठामार्फत होतो. यूजीसी कधीच शासनाशी समन्वय साधत नाही. शासनाला यूजीसीला काही म्हणायचे असेल तर ते मानव संसाधन मंत्रालयाच्या मार्फत केले पाहिजे, असेही तावडे म्हणाले.

मंत्री महोदयांच्या या पत्राला यूजीसीने उत्तरच दिले नाही, असे पत्रकार परिषदेत सांगत असताना सामंत यांनी मे उलटला, जून उलटला, जुलै उलटला, ऑगस्ट उलटून गेला असा उल्लेख केला होता. मात्र, अद्याप जुलै महिना संपला नसताना सामंतांचा ऑगस्टही संपला..? हा उत्साह आदित्य ठाकरेंना खुश करण्यासाठी दिसतो, असा टोलाही तावडे यांनी लगावला.

राज्यातील कुलगुरुंचे काय म्हणणं आहे स्पष्ट करा?

भारतीय जनता पार्टीची ठाम मागणी आहे की विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय करुन त्वरीत निर्णय घेणे शासनाचे कर्तव्य आहे. तसेच यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनंतर राज्यातील कुलगुरुंचे काय म्हणणं आहे? हे सुध्दा कुलगुरुंनी कुलपतीकडे स्पष्ट करावे, अशी भाजपाची मागणी आहे. महाराष्ट्र शासनाने बालहट्टाचा विचार न करता गुणवत्ता व एटीकेटीच्या मुलांच्याच हिताचा हट्ट करावा, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे तावडे म्हणाले.

या परिक्षेबाबत 6 एप्रिलला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कुलगुरु समिती गठीत केली. 29 एप्रिलला युजीसीच्या आदेशाप्रमाणे कुलगुरुंनी अंतिम वर्षाच्या परिक्षा घ्यावा लागतील हे स्पष्ट केले. कुलगुरु समितीने आपला अहवाल 6 मे रोजी सादर केला, 7 मे ला त्याप्रमाणे मंत्रीमहोदयांनी घोषणा केली की प्रथम व द्वितीय वर्षाच्या परिक्षा होणार नाहीत, तृतीय वर्षाच्या परीक्षा होतील. 9 मेला आदित्य ठाकरेनी परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी युवा सेनेमार्फत केली. त्यामुळे लगेच उदय सामंत यांनी आधी केलेली घोषणा बदलली. कुलगुरुंनी स्पष्ट शिफारस केली असताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी यूजीसीला शिफारस पत्र का लिहिले? की केवळ आदित्य ठाकरेंना खूश करण्यासाठी लिहिले. 30 मे ला मुख्यमंत्र्यांनी कुलगुरुंसोबत फेसबुक लाईव्ह बैठक केली. त्या बैठकीत कुलगुरुंनी परीक्षा न घेण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. तरी सुध्दा मुख्यमंत्र्यांनी परीक्षा न घेण्याबाबतचा निर्णय घोषित केला. त्यानंतर 19 जूनला विद्यार्थ्यामध्ये सरासरीने पास होणारे व परीक्षा देऊन पास होणारे अशी वर्गवारी होण्याचे पाप केले, असल्याची टीका तावडेंनी केली.

परीक्षा देऊन पास होण्याचा निकाल लागेपर्यंत पदवीनंतर अभ्यासक्रमाचे प्रवेश रोखून धरणार होते का? याची स्पष्टता नव्हती. 19 जूनच्या या निर्णयानंतर अजूनही शासनाच्या मनात एटीकेटीचा विद्यार्थी किंवा ज्याला उच्च शिक्षणासाठी जायचे आहे, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. आणि त्यानंतर आज कुलगुरुंचे रेकॉर्डिंग करुन काही ठराविक लोकांशी कुलगुरुंना बोलायला लावून आपल्या बालहटट करणाऱ्या नेत्याला खुश करण्यासाठी सगळे प्रयत्न केले. पण नेत्याला खुश करण्याच्या नादात राज्यातल्या विद्यार्थाच्या भवितव्याशी आपण खेळतोय, त्याच्या रोजगाराशी खेळतोय, त्यांच्या उच्च शिक्षण घेण्याच्या स्वप्नाशी आपण खेळतो आहोत हे मंत्री महोदयांनी लक्षात ठेवावे, असा टोला तावडे यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांना लावला.

Last Updated : Jul 10, 2020, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.