ETV Bharat / state

Nitesh Rane On Rahul Gandhi : राहुल गांधींनी, मनोज जरांगे पाटील यांना फोन का नाही केला? नितेश राणे यांचा सवाल - Devendra Fadnavis

Nitesh Rane On Rahul Gandhi : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. यावरून राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. तर आतापर्यंत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) जरांगे पाटलांना फोन का नाही केला? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

Nitesh Rane On Rahul Gandhi
नितेश राणे आणि राहुल गांधी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 5:03 PM IST

प्रतिक्रिया देताना नितेश राणे

मुंबई Nitesh Rane On Rahul Gandhi : राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वातावरण पेटलेलं असताना राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं उपोषण मागे घेण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना सुद्धा ते उपोषणावर ठाम आहेत. अशात महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. या मुद्द्यावर बोलताना भाजपा आमदार, नितेश राणे यांनी सांगितलं आहे की, हे करण्यापेक्षा राहुल गांधींनी (Rahul Gandhi) आतापर्यंत जरांगे पाटलांना फोन का नाही केला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई ते बोलत होते.

मोदी आणि केंद्र सरकार यांच्याकडे बोट का : याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांचं म्हणणं आहे की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळ राष्ट्रपती यांना भेटणार आहे. ते मराठा आरक्षणा संदर्भात केंद्र सरकारला लक्ष घालायला सांगणार आहे. तसंच पंतप्रधान मोदी यांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरती बोलावं. मग उठसूठ तुम्ही मोदी आणि केंद्र सरकार यांच्याकडे बोट का दाखवता? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांची भूमिका काय आहे? राहुल गांधी यांनी याबाबत साधं एक ट्विट तरी केलं आहे का? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

दिवाळीला एकत्र फराळ खाऊ : नितेश राणे पुढे म्हणाले की, राहुल गांधी पाच राज्यांत जाऊन विष पेरत आहेत. राज्यात पेटत असलेल्या या मुद्द्यावर राहुल गांधी यांना मनोज जरांगे पाटलांना एक फोन करायला वेळ नाही. जरांगे पाटील हे शिवबा संघटनेचे आहेत. ते काँग्रेससोबत होते, याची मला माहिती नाही. तसंच तुमच्याकडे याबाबत काही फोटो असतील तर मला माहीत नाही. परंतु देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात पूर्ण क्षमता असल्यामुळे ते फडणवीस यांच्याकडून अपेक्षा करत आहेत. आमच्याकडे म्हण आहे की, ज्या झाडाला जास्त आंबे लागतात, त्यालाच सर्वात जास्त दगड मारले जातात. दिवाळीच्या (Diwali 2023) आधी जरांगे पाटील यांना गोड बातमी देऊ आणि त्यांच्यासोबत आम्ही फराळ खाऊ.

हेही वाचा -

  1. Nitesh Rane : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू मांडावी - नितेश राणे
  2. Nitesh Rane : उद्धव ठाकरेंना अटक करुन चौकशी करावी; 'त्या' प्रकरणावरुन नितेश राणेंची मागणी
  3. Nitesh Rane On Uddhav Thackeray: जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी उद्धव ठाकरेंच कारस्थान - नितेश राणेंचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.