मुंबई - जोगेश्वरी येथील बाळासाहेब ट्रॉमा केअर या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 7 लोकांचा ऑक्सिजन पुरवठ्यात त्रुटी असल्यामुळे 30 मे रोजी मृत्यू झाला होता. याविरोधात आज तक्रारकर्ते आणि माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार अतुल भास्कर हे दिंडोशी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच योग्य तपासाची मागणी यावेळी करणयात आली आहे.
जोगेश्वरी येथील बाळासाहेब ट्रॉमा केअर या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 7 जणांचा ऑक्सिजन पुरवठ्याच्या त्रुटीमुळे मृत्यू झाला होता. एकाच वेळी ही घटना होणं, ही दुर्देवी बाब आहे. या विरोधात आज तक्रारकर्ते नंदा भामरे यांनी तक्रार दाखल केली आहे. यावेळी आम्ही देखील उपस्थित होते. कलम 304 अंतर्गत कारवाई व्हावी अशी आमची मागणी असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
माझे वडील अचानक बेशुद्ध झाल्यामुळे आम्ही त्यांना 27 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेलो. अनेक रुग्णालयात फिरलो मात्र, तिथे जागा न मिळाल्यामुळे आम्ही ट्रामा केअरमध्ये त्यांना घेऊन आलो. 28 मे ला त्यांची टेस्ट केली. 29 ला ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले. मात्र, त्यांच्यावर उपचार काय सुरू आहेत, हे मात्र कळवले नाही. 30 मे ला फोन आल्यावर त्यांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. माझे वडील हे नेहमी जॉगिंग आणि योगा करत होते. त्यांना इतर कोणताही आजार नव्हता. आमची खात्री आहे की त्यांचा मृत्यू अक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे झाला आहे. यामुळे चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नंदा भामरे यांनी केली आहे.