ETV Bharat / state

BJP leader Ashish Shelar : वरळीतील भिंती रंगवण्यापलीकडे 'त्यांनी' मुंबईकरांसाठी केले तरी काय? आशिष शेलारांचा सवाल - भाजप आमदार नितेश राणे

हाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली. देवेंद्र फडवणीस यांना त्याचे श्रेय देण्याबरोबर मागच्या महाविकास आघाडी सरकारवर तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली (BJP leader Ashish Shelar criticized MVA government) आहे.

BJP leader Ashish Shelar
भाजप नेते आशिष शेलार
author img

By

Published : Dec 3, 2022, 1:07 PM IST

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली. त्यामुळे मुंबई शहरातील धोकादायक पुनर्विकास रखडलेल्या हजारो उपकर प्राप्त (सेस) इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश प्राप्त झाले आहे. देवेंद्र फडवणीस यांना त्याचे श्रेय देण्याबरोबर मागच्या महाविकास आघाडी सरकारवर तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली (BJP leader Ashish Shelar criticized MVA government) आहे.

काय म्हणाले शेलार : मुंबईतील उपकर प्राप्त इमारतीमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाला मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतत पाठपुरावा केल्याने मुंबईतील धोकादायक ठरलेल्या हजारो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ५६ रखडलेले पुनर्विकास म्हाडा करणार आहे. मेट्रो, कोस्टल रोड यासह मुंबईकरांचे अनेक प्रश्न सोडवून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला भरभरून दिले. नाहीतर आमची मुंबई म्हणणारे अडिच वर्षे आलेही आणि गेले. वरळीतील भिंती रंगवण्यापलिकडे त्यांनी मुंबईकरांसाठी केले तरी काय? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी विचारला (Ashish Shelar criticized Aditya Thackeray) आहे.

उद्धव ठाकरे टक्केवारीमध्ये अडकले : या विषयावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव सेनेच्या टक्केवारीमुळेच असे प्रकल्प रखडले होते. तसेच याचे पूर्ण श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले जाते. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे, असे सांगत मुंबईकरासाठी भारतीय जनता पक्ष काम करू शकतो, हे आता सिद्ध झाले असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले (criticized MVA government) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.