ETV Bharat / state

Karnataka Border Issue : भाजपने महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद श्रेयासाठी पेटवला; विरोधकांचा आरोप

भाजपने महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (BJP ignites Maharashtra Karnataka border dispute ) श्रेयासाठी (for credit ) पेटवला असा आरोप विरोधकांनी (Accusations of opponents) केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक सीमावाद गाजत आहे. दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वादावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार टीका केली आहे. ( Opponent Leader critics on BJP ) केला आहे.

author img

By

Published : Dec 9, 2022, 8:07 PM IST

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद
Maharashtra Karnataka Borderism

मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद 60 वर्षापासून सुरु आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच हा वाद गाजत आला आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या प्रकरण सुरु आहे. मधेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर अधिकार सांगितला आणि गेल्या काही दिवसात हा वाद चांगलाच रंगला आहे. दोन्ही राज्यात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच सीमा भागात तणाव निर्माण झाला आहे. वाहनांवर दगडफेक होत आहे. हा वाद आता केंद्रात पोचला आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी आज पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे. तेव्हा हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्या एैवजी वाद निर्माण केला जात आहे. यावर विरोधकांनी भाजप आणि केंद्र शासनावर टिका केली आहे.

दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार: महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सुरु असलेल्या सीमावादात आज महाराष्ट्रातील खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली ( Home minister Amit Shah) या प्रश्नी आता शहा मध्यस्थी करणार आहेत. दोन्ही राज्यांमधील सीमावादावर शांतता निर्माण करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी दिली. ( MP Amol Kolhe ) शहा यांच्या भेटी नंतर ते बोलत होते.

खासदार व अमित शहांची भेट: महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्याबद्दल आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर कोल्हे यांनी त्याबाबतची माहिती दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवावे. या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद: महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाबाद गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर हक्क सांगितल्यामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटून उठला. त्यातच कन्नड रक्षण वेदिका या संघटनेने मराठी भाषिकांवर आणि वाहनांवर हल्ले करायला सुरुवात केली. सरकारच्या पाठिंबाशिवाय हे होऊ शकत नाही, असा आरोप राज्यातील विरोधी पक्षांनी केला आहे. जाणीवपूर्वक हा वाद निर्माण केला गेला असून केवळ कर्नाटकात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी हा सारा अट्टाहास आहे, अशा प्रतिक्रिया विरोधी पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिक्रिया व्यक्त करताना

शिंदे हे भाजपाचेच मुख्यमंत्री: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कर्नाटक प्रश्नावर मूग गिळून गप्प बसले आहेत. जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही, सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. त्याच्या तारखा लागतील पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे ते कोणताच बाणेदारपणा दाखवत नाहीत हीच समस्या महाराष्ट्राच्या मनात आहे अशा शब्दात जयंत पाटील यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आपचे धनंजय शिंदे प्रतिक्रिया व्यक्त करताना

भाजपचे विखारी राजकारण: सीमा वादाला पुन्हा एकदा हवा देऊन माथी भडकवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने कर्नाटक मध्ये केले आहे. हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे यासंदर्भात दोन्ही राज्य न्यायालयात आपापली बाजू मांडत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावरच सर्व काही अवलंबून असताना अशा पद्धतीने जनतेला भडकवणे हे अयोग्य आहे. केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कर्नाटकचे मुख्यमंत्री ही खेळी खेळत आहे आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाची ही त्याला मूक साथ आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष अत्यंत विखारी राजकारण करत आहे. त्यांच्या या राजकारणाचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

सत्तेसाठी भाजपाची हीन पातळी: दरम्यान, यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष हा केवळ सत्तेसाठी कुठलीही पातळी गाठू शकतो. हे त्यांनी या प्रकरणात दाखवून दिले आहे. कोणत्याही निवडणुका आल्या की जनतेची जातीवरून धर्मावरून किंवा भाषिक प्रांतवादावरून डोकी भडकवायची आणि मत मिळवायची एवढाच एक कलमी कार्यक्रम भाजपाचा आहे. केंद्रातील भाजप सरकार हे कर्नाटकात असलेल्या भाजप सरकारला आणि महाराष्ट्रातील भाजप सरकारला एकत्र बसवून हा विषय सोडवू शकतो, सामोपचाराने मिटवू शकतो. मात्र जोपर्यंत केंद्राकडे धाव घेतली जात नाही तोपर्यंत केंद्र जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच आता मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रात येऊन गेल्यानंतर त्यांना अधिक मोठेपण मिळावे, यासाठी हा प्रश्न त्यानंतर सामंजस्याने मिटवला गेला हे दाखवण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे, असा टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.