ETV Bharat / state

मुंबईकरांना मोफत आणि त्वरित लस द्या; भाजपा नगरसेवकांची महापौर दालनाबाहेर निदर्शने

लसीकरण केंद्रावरील उसळलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून लसीकरणाच्या प्राथमिक उद्दिष्टास हरताळ फासला जात आहे. तर ही वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून तातडीने सर्वांना मोफत लसीकरण करून मुंबईकरांचे प्राण वाचवण्याची मागणी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

भाजपा नगरसेवकांची महापौर दालनाबाहेर निदर्शने

author img

By

Published : May 4, 2021, 4:51 PM IST

Updated : May 4, 2021, 5:34 PM IST

मुंबई - 'सर्वांना मोफत लस द्या, सर्वांना त्वरित लस द्या, मुंबईकरांचे प्राण वाचवा..!' अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनाबाहेर आज (मंगळवार) जोरदार निदर्शने केली. पालिकेने लसीचे योग्य नियोजन करावे, प्रत्येक वयोगटातील नागरिकांची वेगळी रांग लावावी तसेच आलेल्या लसीच्या साठ्यातून मुंबईकरांना लस द्यावी, अशी मागणी यावेळी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

भाजपा नगरसेवकांची महापौर दालनाबाहेर निदर्शने

'मुंबईकरांचे प्राण वाचवा'

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णसंख्या रोखण्यासाठी व्यापक लसीकरण करणे गरजेचे आहे. गेले तीन दिवस पालिकेने लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना पहिला अथवा दुसरा डोस मिळणार नाही, असे घोषित केले आहे. याआधीही आठवडाभर लसींची कमतरता असल्यामुळे सर्व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण पूर्णत: थांबवले होते. त्यामुळे गेले १० दिवस शासकीय केंद्रांवर लसीकरणासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. यामध्ये वरीष्ठ नागरिकांना विशेषत: ८० वर्षांवरील अती वरिष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रावरील उसळलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून लसीकरणाच्या प्राथमिक उद्दिष्टास हरताळ फासला जात आहे. तर ही वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून तातडीने सर्वांना मोफत लसीकरण करून मुंबईकरांचे प्राण वाचवण्याची मागणी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

या आहेत मागण्या
१) सर्व मुंबईकरांचे मोफत लसीकरण करावे.
२) ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांची स्वतंत्र रांग लसीकरण केंद्रांवर लावण्याच्या सूचना द्याव्यात.
३) अती वरिष्ठ नागरिक म्हणजेच ८० वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी स्वतंत्र रांगेची सोय करावी.
४)४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस घ्यायचा असेल तर नोंदणीनंतर वॉक इन लसीकरण न करता कालबद्ध पूर्व नियोजीत वेळेनुसारच लसीकरण करण्यात यावे.
५) १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना नोंदणीनंतर आगावू निश्चित केलेल्या वेळेनुसारच (Pre booked appointment) लसीकरण करण्यात यावे.
६) मुंबईकरांचे लसीकरण लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी पुरेसा लसीचा पुरवठा प्रत्येक लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करावा.
७) सर्व लसीकरण केंद्रे किमान १२ तास आणि आवश्यक असेल, शक्य असेल तिथे २४ तास लसीकरणासाठी उघडी ठेवावीत. सर्व लसीकरणाची प्रक्रिया आगावू निश्चित केलेल्या वेळेनुसारच करावी.

हेही वाचा -पुण्यात लसीचा तुटवडा; शहरात सलग चौथ्या दिवशी लसीकरण ठप्प

Last Updated : May 4, 2021, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.