मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे चौथ्या मजल्यावर राष्ट्रवादीची बैठक आणि भाजपचा जेवणाचा कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केला. या दोन्ही कार्यक्रमामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा- 'ज्योतिरादित्य हे एकटे नेते होते, जे माझ्या घरी कधीही येऊ शकत होते'
राज्यसभेच्या जागेवरुन मागील काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झालेले आहेत. त्यातच आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या एकाच मजल्यावर भाजपच्या जेवणाचा कार्यक्रम आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. त्यामुळे काँग्रेससाठी हा एक इशारा असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीच्या या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे भाजपच्या जेवणावळीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगल प्रभात लोढा, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गिरीश व्यास, माजी मंत्री विजय शिवतारे, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, नागो गाणार यांनी हजेरी लावली.