ETV Bharat / state

छटपूजेच्या निर्देशांबाबत भाजप आणि काँग्रेसची नाराजी

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार उत्तर भारतीयांना घरातच छटपूजा साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, उत्तर भारतीय अतिशय शिस्तप्रिय असल्याने अशा पद्धतीचे निर्बंध लादू नयेत, अशी प्रतिक्रिया भाजप आणि काँग्रेसने व्यक्त केली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Nov 4, 2021, 5:17 PM IST

Updated : Nov 4, 2021, 9:48 PM IST

मुंबई - येत्या 9 नोव्हेंबरला होणारी छटपूजा उत्तर भारतीयांनी आपापल्या घरीच साजरी करावी, असे परिपत्रक राज्य सरकार व मुंबई महापालिकेने जारी केले आहेत. यामुळे निर्देश दिल्याने भाजपा आणि काँग्रेसने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

उत्तर भारतीयांवर सरकारचा अन्याय - भाजप

उत्तर भारतीय बांधव अतिशय शिस्तप्रिय असतात. त्यामुळे राज्य सरकार कोरोनाच्या नियमांचं पालन करून छटपूजेला परवानगी देऊ शकत होती. मात्र जाणून-बुजून उत्तर भारतीय समाजावर अन्याय करण्यासाठीच अशा पद्धतीचे निर्बंध लादण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे प्रवक्ते अजय सिंह यांनी व्यक्त केली आहे. यावरून मुंबई महानगरपालिकेत सत्तारुढ असलेल्या शिवसेनेची उत्तर भारतीयांप्रती असलेली मानसिकताच लक्षात येते. हा उत्तर भारतीय समाजावर केला गेलेला अन्याय आहे असेही ते म्हणाले.

गणेश उत्सवाला परवानगी, छटपूजेला का नाही..? - काँग्रेस

या संदर्भात बोलताना मुंबई युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरजसिंह ठाकूर यांनी म्हणाले, मुंबई महानगर पालिकेने गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाचे अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केले होते. जर या उत्सवांचे आयोजन व्यवस्थित होऊ शकते. तर छटपूजेला परवानगी का नाकारण्यात आली आहे. यामुळे मुंबईमध्ये राहणाऱ्या सुमारे 30 लाख उत्तर भारतीयांवर अन्याय होत असल्याची भावना प्रकर्षाने जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहेत मार्गदर्शक सूचना

उत्तर भारतातून विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले लाखो लोक मुंबईत वसले आहेत. मुंबईत वसलेल्या उत्तर भारतीयांकडून दरवर्षी छटपूजा हा उत्सव समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे घेले नसल्याने यंदाही समुद्र, नदी, अथवा तलाव या ठिकाणी गर्दी टाळावी आणि घरीच छटपूजा साजरी करावी, असे निर्देश राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी करत दिले आहेत.

केव्हा आहे छटपूजा..?

यंदा 9 नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ते 10 नोव्हेंबरच्या सूर्योदयापर्यंत छटपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी मुंबईतील उत्तर भारतीय बांधव मोठ्या उत्साहाने तयारीला लागल्याचे दिसते आहे. मात्र, असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षांपासून ज्या पद्धतीने सर्वधर्मीयांनी एकत्र न येता उत्सव साजरे केले आहेत. त्याच पद्धतीने उत्तर भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता गर्दी न करता उत्सव साजरा करा,वा असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

हे ही वाचा - मुंबई पोलिसांनी आदिवासी पाड्यात जाऊन साजरी केली दिवाळी

Last Updated : Nov 4, 2021, 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.