ETV Bharat / state

मुंबई : नगरसेवक फुटण्याच्या भीतीनेच भाजपाकडून शिवसेनेवर बेछूट आरोप - स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून सफाई कामगारांच्या घरांमध्ये १८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आज भाजपाकडून पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना यशवंत जाधव बोलत होते. यावेळी बोलताना,मुंबईतील सफाई कामगारांना ‘आश्रय’ योजनेतून घर देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे.

shivsena leader yashwant jadhav
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव
author img

By

Published : Oct 16, 2021, 10:45 PM IST

मुंबई - महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक सत्ता नसल्याने कोणतीही पदे मिळत नसल्याने त्रस्त झाले आहेत. तसेच आपल्याच पक्षातील वरीष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभाराला नगरसेवक कंटाळले आहेत. यामुळे या नगरसेवकांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच भाजपा नेत्यांकडून शिवसेनेवर बेछूट आरोप केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. नेत्यांच्या कारभाराला कंटाळलेले अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात असून डिसेंबर महिन्यात भाजपला खिंडार पाडू, असा दावाही जाधव यांनी केला.

भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवा -

मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून सफाई कामगारांच्या घरांमध्ये १८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आज भाजपाकडून पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना यशवंत जाधव बोलत होते. यावेळी बोलताना,मुंबईतील सफाई कामगारांना ‘आश्रय’ योजनेतून घर देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३०० ते ६०० चौरस फुटांची हजारो घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरही झाले आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत हे प्रस्ताव मांडले जात असताना भाजपचे नगरसेवक मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवालही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. भाजपने ‘आश्रय’ योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा केलेला आरोप सिद्ध करून दाखवावा, असे आव्हानही शिवसेनेने दिले आहे. आपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून धमकावले जात असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा - महापालिका सफाई कामगारांच्या घरांमध्ये १८४४ कोटी रुपयांचा घोटाळा - भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे

शिवसेनेमुळे सफाई कामगारांना घरे -

सफाई कामगारांना कामाच्या ठिकाणापासून जवळ घर मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. अखेर हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. यामध्ये मुंबई शहरात ११२१, पश्चिम उपनगरात १४९९ आणि पूर्व उपनगरात १३८६ अशी एकूण ४००६ घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेनेच सफाई कामगारांना न्याय दिला असल्याचे जाधव म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.