ETV Bharat / state

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, राज्यातील १४ जणांना पुन्हा उमेदवारी, दोघांचे पत्ते कट - LOKSABHA 2019 POLL

यात नितीन गडकरी, हंसराज अहीर, रावसाहेब दानवे, पूनम महाजन, प्रीतम मुंडे यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

भाजपची पहिली उमेदवार यादी जाही
author img

By

Published : Mar 21, 2019, 8:04 PM IST

Updated : Mar 21, 2019, 11:26 PM IST

मुंबई - भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यात राज्यातील १६ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विद्यमान १४ खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर २ विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यात नितीन गडकरी, हंसराज अहीर, रावसाहेब दानवे, पूनम महाजनयासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

भाजपकडून अहमदनगर आणि लातूरच्या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेल्या डॉ. सुजय विखे-पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करून दिलीप गांधी यांचा पत्ता कट केला आहे. सोबतच लातूर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांच्या ठिकाणी सुधाकर श्रृंगारे हा एक नवीन चेहरा भाजपने दिला आहे. गांधी आणि गायकवाड यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व १४ विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यात आले आहे.

राज्यातील माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे बंड थंड करण्यासाठी त्यांची सून रक्षा खडसे यांनाच रावेरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुनेला तिकिट न मिळाल्यास एकनाथ खडसे हे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, अशी राजकीय चर्चा होती. खडसेंचे हे बंड निवडणुकीत न परवडणार होते. त्यामुळे खडसेंचे सतत पंख कापणाऱ्या भाजपने थोडी नरमाईची भूमिका घेत त्यांच्या सुनेलाच पुन्हा एकदा रावेरची उमेदवारी बहाल केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांना अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा तिकिट मिळाले आहे.

भाजपने आज देशातील १८२जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यात गांधीनगरमधून भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कट करून भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून तर केद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लखनौमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार

नागपूर - नितीन गडकरी,जालना - रावसाहेब दानवे, चंद्रपूर- हंसराज अहिर, धुळे - सुभाष भामरे, नंदुरबार - हीना गावित, रावेर- रक्षा खडसे, अकोला - संजय धोत्रे, वर्धा - रामदास तडस, गडचिरोली-चिमुर - अशोक नेते, भिवंडी - कपिल पाटील, मुंबई उत्तर - गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन, अहमदनगर - सुजय विखे पाटील, बीड - डॉ. प्रीतम मुंडे, लातूर - सुधाकरराव शिंगारे, सांगली - संजयकाका पाटील

Intro:Body:

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, राज्यातील १४ जणांना पुन्हा उमेदवारी, दोघांचे पत्ते कट

दिल्ली -  भाजपच्या पहिल्या उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यात राज्यातील १६ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विद्यमान १४ खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर २ विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

Conclusion:
Last Updated : Mar 21, 2019, 11:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.