मुंबई - उत्तर भारतीयांमध्ये महत्त्वाचा आणि श्रद्धेचा मानला जाणारा छट पूजेचा उत्सव पवई तलावाच्या काठावर दिसून आला. यावेळी हजारोच्या संख्येने उत्तर भारतीय बांधवांनी मोठ्या भक्तीभावाने छट देवीची पूजा केली.
हेही वाचा - आताची परिस्थिती भाजपच्या 'नालायक'पणामुळे - विजय वडेट्टीवार
मुंबई उपनगरातील पवई तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने उत्तर भारतीय बांधवांनी छटपूजा केली. मुंबई पालिकेने तलावात कोणीही उतरू नये यासाठी लाकडी बांबू बांधले होते. तर पवई पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती. काही सामजिक संस्थानी नागरिकांसाठी तलाव ते बस ठिकाणी पोहचण्यासाठी रिक्षाची व्यवस्था केली होती. यावेळी चांदीवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांनीही कार्यक्रमात उपस्थित लावत छट पूजेकरिता आलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या.
उत्तर भारतीय लोकांमध्ये छटपूजा हा महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी सूर्याची मनोभावे पूजा केली जाते. कुटुंबातील महिला तीन दिवसांचा उपवास करतात व शेवटच्या दिवशी उगवत्या व मावळत्या वेळी सूर्याची पूजा करतात. शेतातील पीक, धान्य, ऊस, केळी इतर फळांचा नैवेद्य छट पूजेच्या दिवशी सूर्याला दाखवला जातो.