ETV Bharat / state

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना राज्य सरकार करणार आर्थिक मदत; मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर

big-breaking
बिग ब्रेकिंग
author img

By

Published : Jun 2, 2021, 6:18 AM IST

Updated : Jun 2, 2021, 4:55 PM IST

16:54 June 02

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना राज्य सरकार करणार आर्थिक मदत; मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर

मुंबई - राज्यातील कोरोनाकाळात अनाथ झालेल्या बालकांना राज्य सरकार आर्थिक सहाय्य करणार आहे. राज्य सरकार अनाथ बालकांना 5 लाख रुपये आर्थिक मदत करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 5172 मुलांनी 1 पालक गमावला आहे. तर, 162 मुलांचे दोन्ही पालक कोरोनाने हिरावले आहेत. बालकांच्या नावे 5 लाखांची मुदत ठेव ठेवण्यात येणार आहे. 21 व्या वर्षी व्याजासहित रक्कम मिळणार आहे.  

13:54 June 02

जळगाव - व्हॉट्सऍपवर भावनिक स्टेटस ठेऊन एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना जळगावातील अयोध्यानगर परिसरातील सद्गुरू नगरात मंगळवारी रात्री घडली असून, ती आज (बुधवारी) सकाळी उजेडात आली. हर्षल प्रेमनाथ महाजन (वय 29, रा. सद्गुरू नगर, जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

हर्षल महाजन हा एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. तो सद्गुरू नगरात पत्नी, आई-वडील आणि भाऊ यांच्यासोबत राहत होता. काल आई-वडिलांसह जेवण केल्यानंतर तो रात्री 10 वाजता झोपला. मध्यरात्रीनंतर घरात सर्वजण झोपलेले असताना त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

12:04 June 02

मागील 24 तासांत देशात 1,32,788 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2,31,456 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, याबरोबरच 3,207 बाधितांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

देशातील कोरोनाची सद्यस्थिती - 

एकूण रुग्ण - 2,83,07,832

एकूण बरे झालेले रुग्ण - 2,61,79,085 

एकूण मृत्यू - 3,35,102

सक्रिय रुग्ण - 17,93,645

एकूण लसीकरण - 21,85,46,667

12:00 June 02

मुंबई - वांद्रे येथील ड्रग पेडलर हरीश खान याला नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डकडून अटक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह अमली पदार्थ प्रकरणाशी संबंधित ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती एनसीबीने दिली. 

11:58 June 02

निवृत्त न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या चेअरमनपदाचा पदभार स्वीकारला. 

09:17 June 02

खेडकर कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर... कांताबाई सातारकर यांच्या पाठोपाठ मुलगी व नातू यांचं निधन...

09:04 June 02

पुणे - चारित्र्यावर संशय घेत एका व्यक्तीने पत्नीचा खून करत स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वडगाव शेरी येथील पिराजी नगरमध्ये हा प्रकार घडला. उषा योगेश गायकवाड (वय 28) आणि योगेश तानाजी गायकवाड (वय 33) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

07:38 June 02

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात आतापर्यंत 594 डॉक्टर्सचा मृत्यू झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. 

06:56 June 02

नांदेड - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नांदेड दौऱ्यावर आहेत. ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयाला भेट देणार आहेत.

06:27 June 02

मुंबई - इंधन दरवाढविरोधात आज मुंबई काँग्रसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रसचे कार्यकारी अध्यक्ष चरण सिंग साप्रा, आदी उपस्थित राहणार आहेत.

06:06 June 02

dummy

ani tweet
याबाबत वृत्तसंस्थेने दिलेले ट्विट

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवाचे आकलन करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आपला प्रारंभिक अहवाल काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केला आहे.

Last Updated : Jun 2, 2021, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.