केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशांक यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती एम्सच्या सुत्रांनी दिली.
केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती - Big Breaking news
12:10 June 01
केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती
11:45 June 01
मंत्री नवाब मलिक यांनी दिली महत्वाची माहिती
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) कोट्यात मराठा समाजाला लाभ घेता येईल, असा आदेश सरकारच्या वतीने निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. कुठल्याही वर्गात आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्या समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात लाभ मिळणार आहे. ज्यांचे उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
11:02 June 01
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली महत्वाची बैठक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाची बैठक बोलाविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांची बैठक होणार आहे. सायंकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक होत आहे. बैठकीत सर्व मंत्री आणि नेत्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत.
10:58 June 01
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात बैठक सुरू
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात बैठक सुरू झाली आहे. बैठकीला मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नितीन राऊत के सी पाडवी आदी मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित आहेत. पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवण्यात यावे, अशी कॉंग्रेसची भुमिका आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
10:42 June 01
मागील 24 तासांत देशात 1,27,510 नविन कोरोनाबाधितांची नोंद
मागील 24 तासांत देशात 1,27,510 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2,55,287 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. याबरोबरच 2,795 बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
देशातील एकूण रुग्णसंख्या - 2,81,75,044
एकूण बरे झालेल्यांची संख्या - 2,59,47,629
एकूण मृत्यू - 3,31,895
सक्रिय रुग्ण - 18,95,520
एकूण लसीकरण - 21,60,46,638
10:41 June 01
भाजपचे आमदार महेश लांडगेंसह ६० जणांवर गुन्हा दाखल
पुण्यात लग्नसोहळ्यात कार्यक्रमात कोविडच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
09:11 June 01
अभिनेता करन मेहराला अटक
अभिनेता करन मेहरा याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. करन मेहरा याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल हिने भांडणानंतर त्याच्याविरोधात गोरेगाव येथे तक्रार दाखल केली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
09:00 June 01
औरंगाबादच्या बाजारपेठा उघडण्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी
औरंगाबाद - आजपासून औरंगाबादच्या बाजारपेठा उघडण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. दि. 30 मे, 2021 रोजीच्या आदेशानुसार दिनांक 01 जून 2021 रोजी सकाळी 7.00 पासून दिनांक 15 जून 2021 च्या सकाळी 07.00 वाजेपर्यंत कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याचे निर्देशित केले आहे. शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व सक्षम तरतुदींसह साथीच्या रोग अधिनियम, 1897 मधील कलम 2 अन्वये ही परवानगी दिली.
08:44 June 01
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून मिळणार लाभ
मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणाच्या १०% ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) कोट्यातून लाभ घेता येणार : महाराष्ट्र सरकार
08:35 June 01
मालेगावात भीषण अपघात
मालेगाव - कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर आणि सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची समोरा समोर धडक होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेत भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन्ही वाहने जळून खाक तर 2 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना मनमाड-मालेगाव रोडवरील कौळाने येथे घडली. मालेगाव अग्निशमन दल आणि तालुका पोलीस घटनास्थळी दाखल दाखल झाले आहेत.
06:06 June 01

हैदराबाद - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (मंगळवारी) जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर भागातील भागाला भेट देणार आहेत. वादळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करतील.