ETV Bharat / state

PM Modi Mumbai Visit : उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांचा धडाका, बृहन्मुंबईच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे.

PM Modi Mumbai Visit
उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
author img

By

Published : Jan 18, 2023, 7:53 PM IST

Updated : Jan 18, 2023, 10:34 PM IST

मुंबई : गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी, वांद्रे - कुर्ला संकुल परिसरातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मैदानात गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतील २० नवीन दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ७ मजली प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन, महानगरपालिकेच्या ३ रुग्णालयांच्या इमारतींचे भूमिपूजन आणि महानगरपालिकेच्या अखत्यारितील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा लाभ होणार आहे. या वितरणाचा शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

जल-मल योजनेसाठी १७,१८२ कोटी निधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई मलनिःसारण प्रकल्प या खात्याद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या ७ जल-मल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या अंतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज २४६.४० कोटी लीटर अर्थात २ हजार ४६४ दशलक्ष लीटर जल-मलावर प्रक्रिया करण्याची असणार आहे. या जल-मल प्रक्रिया केंद्रांसाठी रुपये १७ हजार १८२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या कार्याअंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहेत. यासोबतच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मितीही केली जाणार आहे. तर बाहेर पडणाऱ्या गाळावर ‘अ’ दर्जाअंतर्गत प्रक्रिया करण्यात येणार आहे.

रस्त्यांच्या कामासाठी ६,०७९ कोटी खर्च : याच कार्यक्रमात काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या अंतर्गत ३९७ किलोमीटर लांबीच्या 'रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येईल. या उपक्रमामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होईल. या कामांसाठी अंदाजे रु. ६,०७९ कोटी इतका खर्च येईल. हे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण होईल असा अंदाज आहे. या कामांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर भागात ७२ किमी लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरात ७१ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. तर पश्चिम उपनगरात २५४ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. यांनुसार तीनही क्षेत्रात एकूण ३९७ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.

Last Updated : Jan 18, 2023, 10:34 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.