ETV Bharat / state

Rahul Gandhi Bhiwandi Case : राहुल गांधींवरील भिवंडीतील मानहानी दाव्याच्या सुनावणीतून कायमची सूट, पुढील सुनावणी ३ जूनला - राहुल गांधी यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माजी खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भिवंडी येथील जलद गती न्यायालयाने राहुल गांधी यांना खटल्याच्या सुनावणीमध्ये कायमची हजर राहण्यापासून सूट दिलेली आहे. त्यामुळे राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Rahul Gandhi Bhiwandi Case
Rahul Gandhi Bhiwandi Case
author img

By

Published : Apr 15, 2023, 3:05 PM IST

Updated : Apr 15, 2023, 3:50 PM IST

मुंबई : भिवंडीतील भाषणात राहुल गांधी यांनी आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत त्यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांचे वकिलांनी भिवंडी न्यायालयाच्या राहुल गांधींना सुनावणीतून कायमस्वरूपी सूट मिळावी यासाठी दाखल केलेल्या अर्जावर तक्रारदाराचे वकील प्रबोध जयवंत यांनी हरकत घेऊन युक्तिवाद केला. यावर राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी बाजू मांडत युक्तिवाद करत न्यायालयात योग्य बाजू मांडल्याने राहुल गांधी यांना या दाव्यातून कायमस्वरूपी सूट देण्याचा निर्णय न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सुनावणीवेळी दिल्याने राहुल गांधींना दिलासा मिळाला आहे.

राहुल गांधीं विरोधात मानहानीचा दावा : राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले की, आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे भिवंडी न्यायालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडीतील पदाधीकारी राजेश कुंटे यांनी कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला होता. तक्रारदाराचे वकील जयवंत यांनी राहुल गांधींच्या कायमस्वरूपी सूट मिळावी या अर्जाविरुद्ध पर्सिस दाखल करीत राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने दोषी ठरवण्याच्या आदेशामुळे परिस्थितीत बदल झाल्याचा गेल्या सुनावणी वेळी युक्तिवाद केला होता. मात्र, राहुल गांधींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकिलांनी अपात्रतेचा आदेश बेकायदेशीर असल्याचा जोरदार युक्तिवाद केला. तसेच त्याला योग्य न्यायालया समोर आव्हान दिले जावे, असे सांगताच यावर तक्रारकर्त्याने उपस्थित केलेल्या वादामुळे नामनिर्देशित विशेष खासदार/आमदार न्यायाधीशांसमोर प्रलंबित असलेल्या मानहानीच्या खटल्यातून कायमस्वरूपी सूट मिळावी या मागणीमुळे आरोपीला हानी पोहोचू शकत नाही, किंवा दुर्लक्ष करू शकत नाही. असे भिवंडी जलदगती न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी लक्ष्मीकांत वाडीकर यांनी दोन्ही पक्षकारांना सांगितले होते. आज झालेल्या सुनावणीवेळी राहुल गांधी यांनी मागितलेल्या सुनावणीसाठी हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्याच्या मुद्द्यावर युक्तिवाद होऊन राहुल गांधींना या दाव्याच्या सुनावणीतुन कायमस्वरूपी सूट देण्यात आल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी दिली.

महात्मा गांधीची हत्या संघाने केल्याचे वक्तव्य : आरएसएस च्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्या संदर्भात भिवंडी येथील जलद गती न्यायालयाने राहुल गांधी यांना खटल्याच्या सुनावणीमध्ये कायमची हजर राहण्यापासून सूट दिलेली आहे. आज झालेल्या भिवंडी न्यायालयात सुनावणीत हा निर्णय विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिला. देशभर 2014 या काळात लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापलेले होते प्रचाराच्या दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या सभा महाराष्ट्रात होत्या. त्यावेळेला भिवंडी येथे काँग्रेस पक्षाची मोठी प्रचार सभा होती .त्यावेळेला राहुल गांधी यांनी सार्वजनिक सभेमध्ये वक्तव्य केले होते की महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानवर राजकीय वातावलरण चांगलेच तापले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याविरोधात आक्रमक भूमीका घेत भिवंडी न्यायालयात राहुल गांधी विरोधात याचिका दाखल केली होती.

कायम हजर राहण्यापासून सूट : राहुल गांधी यांनी सार्वजनिक रित्या हे विधान केल्यानंतर भिवंडी येथील पोलीस ठाण्यामध्ये राजेश कुटे यांच्याकडून राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हा खटला न्यायालयात पोहोचला. भिवंडी न्यायालयामध्ये शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फिर्यादी राजेश कुंटे तर्फे वकील गणेश धारगळकर यांनी बाजू मांडली. तर, खासदार राहुल गांधी यांच्या वतीने वकील नारायण अय्यर यांनी बाजू मांडली. राहुल गांधी यांच्या वकिलांनी खटल्यामध्ये कायम हजर राहण्यापासून सूट मिळावी अशी विनंती न्यायालयाला केली गेली होती. न्यायालयाने राहुल गांधी यांच्या वकिलांनी केलेली याचिकेमधील विनंती ग्राह्य म्हणून राहुल गांधी यांना कायम हजर राहण्यापासून सूट दिलेली आहे.

काय आहे प्रकरण?: भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधींची हत्या आरएसएसने केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेविरोधात खासदार राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत या याचिकेवर दिल्ली न्यायालयात सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यावेळी राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रासह आपल्या भाषणाचा उतारा उच्च न्यायालयात दाखल केला. हा उतारा भिवंडी न्यायालयात पुरावा म्हणून दाखल करावा, असा अर्ज याचिकाकर्ते राजेश कुंटे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.

राहुल गांधींनी आरोप फेटाळले होते: परंतु 12 जून 2018 रोजी भिवंडी कोर्टासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान राहुल गांधींनी आपल्यावरील आरोप फेटाळले. तसेच, खासदार राहुल गांधी यांच्या वकिलांनी ही याचिका समन्स ट्रायल म्हणून चालवण्याची मागणी केली होती. तसेच भिवंडी न्यायालयात उच्च न्यायालयाची कागदपत्रे दाखल करण्यास न्यायालयाचा विरोध होता. त्यावेळी ही याचिका समन्स ट्रायल म्हणून चालवण्यास न्यायालयाने मान्यता दिली होती.

हेही वाचा - Raigad Bus Accident : खोपोलीतील दरीत बस कोसळून 13 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून एकूण 7 लाखांची मदत जाहीर

Last Updated : Apr 15, 2023, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.