मुंबई - बहुजन विकास आघाडीच्या तिनही आमदारांनी आज महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा जाहिर केला. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर व बोइसरचे आमदार राजेश पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. त्यांनतर त्यांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला.
-
बहुजन विकास आघाडीचे वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर व बोइसरचे आमदार राजेश पाटील यांच्यासह खा. @PawarSpeaks साहेबांची भेट घेऊन #MaharashtraVikasAghadi ला आपला पाठिंबा जाहीर केला.
— NCP (@NCPspeaks) November 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
@supriya_sule @praful_patel pic.twitter.com/l7XW77ozM8
">बहुजन विकास आघाडीचे वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर व बोइसरचे आमदार राजेश पाटील यांच्यासह खा. @PawarSpeaks साहेबांची भेट घेऊन #MaharashtraVikasAghadi ला आपला पाठिंबा जाहीर केला.
— NCP (@NCPspeaks) November 27, 2019
@supriya_sule @praful_patel pic.twitter.com/l7XW77ozM8बहुजन विकास आघाडीचे वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर व बोइसरचे आमदार राजेश पाटील यांच्यासह खा. @PawarSpeaks साहेबांची भेट घेऊन #MaharashtraVikasAghadi ला आपला पाठिंबा जाहीर केला.
— NCP (@NCPspeaks) November 27, 2019
@supriya_sule @praful_patel pic.twitter.com/l7XW77ozM8
याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्वीटरद्वारे दिली. हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी त्यांचे आभार मानले. या तिन्ही आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने संख्याबळ आणखी वाढले आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचीही या तिन आमदारांनी भेट घेत समर्थन देत असल्याचे सांगितले. अशोक चव्हाण यांनीही त्यांचे आभार मानले.