मुंबई- दिवाळीचा समारोप बहीण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट करणाऱ्याला भाऊबीजने होते. मंगळवारी शहारात सर्वत्र भाऊबीज साजरी करण्यात आली. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्यांच्यामध्ये भेटवस्तूंचे आदानप्रदान होते. भावाला ओवाळून त्याच्या दिर्घायुष्यासाठी बहिणीकडून प्रार्थना केली जाते.
भाऊबीजेच्या दिवशी उपनगरीय रेल्वे सेवा आणि बेस्ट बस सेवेवर जास्त ताण असतो. उत्सव साजरा करण्यासाठी कुटुंबे घराबाहेर पडतात. दररोज प्रवास न करणारे प्रवासी यात जास्त असतात. भाऊबीजेला गोडधोड जेवणासह मांसाहारी जेवणाचा बेत आखला जातो. मात्र, भाऊबीजेच्या दिवशी मंगळवार आल्याने अनेकांनी मांसाहार रद्द केला. या दिवशी ओवाळणीच्या वेळी भावाचे तोंड गोड केले जाते. त्यामुळे बाजारात मिठाईची भरपूर मागणी होती. मिठाईच्या दुकानात लोकांची गर्दी उसळली होती. यावेळी बाजारात चॉकलेटचीही मागणी वाढली होती.