ETV Bharat / state

कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्षच्या जामीन अर्जावर आज सुनावणी - bharti sing arrrest news

भारती आणि तिचा पती हर्ष यांनी आपला जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला असून त्यावर आज सुनावणी होणार आहे.

bharti-and-her-husband-harshs-bail-application-to-be-heard-today-by-court-in-mumbai
कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्षच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
author img

By

Published : Nov 23, 2020, 2:16 AM IST

Updated : Nov 23, 2020, 6:24 AM IST

मुंबई - प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह मोठ्या अडचणीत सापडली आहे. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्यावर एनसीबीने आपली पकड घट्ट केली आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या किला कोर्टाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भारती आणि हर्ष यांनी आपला जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला असून त्यावर आज सुनावणी होणार आहे.

दोघांनाही न्यायालयीन कोठडी-

रविवारी भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना प्रथम वैद्यकीय आणि कोरोना चाचणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर भारती आणि हर्ष यांना कोर्टात हजर करण्यात आले. तसेच भारती आणि हर्ष यांच्यासह दोन ड्रग्ज पेडरही कोर्टात हजर करण्यात आले. एनसीबीने भारतीचा पती हर्ष याचा कोर्टाकडून रिमांड मागितला होता. परंतु कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर कोर्टाने या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

भारतीच्या घरात 86 ग्रॅम गांजा

शनिवारी रात्री भारतीची आई आणि तिचा मित्र तिला भेटण्यासाठी एनसीबी कार्यालयात आले. भारतीला काही औषधे देण्यासाठी येत असल्याचे सांगण्यात आले. त्यांना विचारल्यानंतरही त्यांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाही. भारती सिंहच्या घरात 86 ग्राम गांजा आढळला यासंदर्भात बोलताना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले, की ड्रग्स आढळून आल्याने कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष यांना ताब्यात घेण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी हे ड्रग्स आढळून आले आहे.

ड्रग्ज घेतल्याची दिली होती कबुली

शनिवारी मुंबईतील भारती यांच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. यावेळी तेथून गांजा जप्त करण्यात आला होता. चौकशी दरम्यान भारतीसिंग यांनी आपण ड्रग्ज घेतल्याची कबुलीही दिली होती. सुमारे 6 तासांच्या चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली. यानंतर तिच्या पतीलाही रात्री उशिरा अटक करण्यात आली.

कोण आहे भारती सिंह?

भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. तीचा जन्म 3 जुलै 1980 मध्ये झाला होता. ती पंजाबमधील असून तीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबचियासोबत लग्न केले होते. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 'इंडियन लाफ्टर चॅलेन्ज'मधून केली होती. त्यातील तीचे लल्ली हे पात्र फारच प्रसिद्ध झाले होते. भारती सिंहने कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाईट्स बचाओ, जुबली कॉमेडी सर्कस मध्ये काम केले आहे. तसेच तिने प्यार में ट्विस्ट मध्येही काम केले आहे. याचबरोबर तीने अनेक कार्यक्रमांचे निवेदन केले आहे.

Last Updated : Nov 23, 2020, 6:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.