ETV Bharat / state

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाचे ४ उमेदवार जाहीर - Maharashtra Legislative Council election

पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या ४ विभागातील उमेदवारांची नावे भाजपाकडून जाहीर करण्यात आले आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे ४ उमेदवार जाहीर

author img

By

Published : Nov 9, 2020, 12:37 PM IST

Updated : Nov 9, 2020, 12:55 PM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाने विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या ४ विभागातील उमेदवारांची नावे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहेत. शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, औरंगाबादेतून शिरीष बोराळकर, नागपूरमधून संदीप जोशी आणि औरंगाबादेतून नितीन धांडे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. याबरोबरच उत्तर प्रदेशातील रिक्त ९ जागांसाठीही भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

  • Bharatiya Janata Party releases names of candidates for biennial elections in Uttar Pradesh Legislative Council & Maharashtra Legislative Council pic.twitter.com/lmMfsXPCtE

    — ANI (@ANI) November 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघातून भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडून आले होते. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते विजयी झाल्याने ही पदवीधरची जागा रिक्त राहिली होती. नागपूरमधून भाजपाचे सदस्य अनिल सोले यांचीही 19 जुलैलाच मुदत संपली होती, तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सतीश चव्हाण तसेच शिक्षक मतदारसंघापैकी पुण्यातील अपक्ष सदस्य दत्तात्रय सावंत, अमरावती शिक्षक मतदारसंघातील श्रीकांत देशपांडे यांचीही मुदत यादरम्यान संपुष्टात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडला होता.

दोन दिवसातच जाहीर होणार निकाल -

या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत या पाचही मतदारसंघात उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 13 नोव्हेंबरला अर्जाची छाननी करण्यात येणार असून 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या पाच मतदारसंघात 1 डिसेंबरला मतदान होणार असून दोन दिवसांनी म्हणजेच 3 डिसेंबरला या पाचही जागांचा निकाल जाहीर होणार आहे.

Last Updated : Nov 9, 2020, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.