ETV Bharat / state

Aaditya Thackeray On BJP : घटनाबाह्य सरकारमध्ये इंपोर्ट केलेल्यांचीच चलती, आदित्य ठाकरेंचा युती सरकारवर हल्लाबोल - Aaditya Thackeray criticizes BJP

राज्यात भारतीय जनता पक्षाने दोन पक्ष फोडले. आणखी एक परिवार फोडला आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी भाजपावर केला आहे. तसेच भाजपातील मूळ नेत्यांना वंचित ठेवल्याचा दावाही ठाकरे यांनी केला आहे.

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Aug 19, 2023, 7:14 PM IST

Updated : Aug 19, 2023, 10:07 PM IST

आदित्य ठाकरे प्रतिक्रिया देताना

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलेली खंत निश्चितच खरी आहे. नितीन गडकरी म्हणतात त्याप्रमाणे भाजपामध्ये 70 टक्के डुप्लिकेट नेते (70 percent duplicate leaders in BJP) आहेत. मुळात भाजपाचे केवळ 30 टक्के नेते आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देत होते.

भाजपाच्या नेत्यांना ठेंगा : भारतीय जनता पक्षात केवळ पाच-सहा नेतेच मूळ पक्षाचे आहेत. बाकी सर्व आयात केलेला माल आहे, अशा कठोर शब्दात ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. इतर पक्षांनी नाकारलेला माल भाजपाने घेतला आहे. हे सगळं करून महाराष्ट्रात भाजपाला काय मिळालं, हा खरा प्रश्न आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्याला भाजपात काहीच मिळालेलं नाही, हे भाजपा कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या लक्षात कधीतरी येइल, असं देखील ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपाने राज्यात दोन पक्ष, एक कुटुंब फोडलं, मात्र भाजपाच्या नेत्यांना घटनाबाह्य सरकारने ठेंगा दाखवल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.

उद्या लोकसभा निवडणूक स्थगित करतील : मुंबई विद्यापीठाच्या जाहीर झालेल्या सिनेटच्या निवडणुका अचानक रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भाजपा सरकारला निवडणुकांची भीती वाटत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डरपोक आहेत. त्यामुळे सरकार निवडणुकांना घाबरतं अशी टीका ठाकरे यांनी शिंदेंवर केली आहे. उद्याच्या लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यताही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आपल्या देशात लोकशाही नाही, असं समजून पुढची वाटचाल सुरू आहे. हे देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. मी काही लोकांवर बोलत नाही, त्यांना काय करायचं ते करू द्या, असा टोला आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंना लगावला आहे.

बालेकिल्ला कोणाचाच नाही : नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला असून तुम्ही तिकडे जात आहात, असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारला. त्यावर ते म्हणाले की, बालेकिल्ला कोणाचाही नसतो. मी गेल्यावेळी कोणावरही टीका केली नव्हती. मी नाशिकला युवकांशी चर्चा करायला निघालो आहे, असे ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

MU Senate Election : सिनेट निवडणुकीवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Last Updated : Aug 19, 2023, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.