मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बदलाचे वारे सध्या वाहू लागले आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्ता स्थापनेवेळीच कसे अडचणीत होते हे त्यांचे सहकारी आमदार भरत गोगावले यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे.
आमदारांनी एकनाथ शिंदे यांना दिला पाठिंबा : शिवसेनेतून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापन करताना भरत गोगावले यांच्यासोबत अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, यापैकी अनेक आमदारांना मंत्रिपदाची स्वप्ने पडली होती. त्यामुळे त्यांनी केवळ मंत्रिपदासाठी शिंदे यांना साथ दिल्याचे आणि त्यासाठी काय काय अटी घातल्याचे गमती भरत गोगावले यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितल्या आहेत.
काही आमदारांनी तर थेट शिंदे यांना धमकीच दिली, जर आम्हाला मंत्रिपद मिळाले नाही तर आम्ही शपथविधी झाल्यावर लगेच बाहेर पडणार. एका आमदाराने सांगितले की, माझ्या पत्नीने आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. तर एका आमदाराने जर मी मंत्री झालो नाही तर मला नारायण राणे संपवतील असेही सांगितले - भरत गोगावले, आमदार, शिवसेना ठाकरे गट
आमदारांनी दिली होती धमकी : यावेळी बोलताना गोगावले म्हणाले की, सत्ता स्थापनेवेळी प्रत्येकाला मंत्री व्हायचे होते. काही आमदारांनी तर थेट शिंदे यांना धमकीच दिली होती. आम्हाला मंत्रिपद मिळाले नाही तर आम्ही शपथविधी झाल्यावर लगेच बाहेर पडणार. एका आमदाराने सांगितले की, माझ्या पत्नीने आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. तर एका आमदाराने, जर मी मंत्री झालो नाही तर मला नारायण राणे संपवतील असे सांगितले.
मुख्यमंत्री अडचणीत आले होते : गोगावले पुढे म्हणाले की, संभाजीनगरच्या तीन आमदारांना मी म्हणालो अरे आम्ही रायगडमधून तीन आमदार आहोत. आमचा विचार करणार की नाही, पण कोणीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत आले होते. अशावेळेस शिंदे यांना अडचण होऊ नये आणि व्यवस्थित सत्ता स्थापन व्हावे यासाठी आम्ही मागे थांबलो. आज आम्हाला आमचे सहकारी तुम्ही का मंत्री झाला नाही म्हणतात त्यामागे ही सर्व पार्श्वभूमी आहे.
हेही वाचा -