ETV Bharat / state

भंडारा रुग्णालयातील दुर्घटनेनंतर सर्व रुग्णालयांचे 'फायर ऑडीट' होणार - hospital fire audit news

दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 9, 2021, 10:21 AM IST

मुंबई - भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

तातडीने ऑडिट करा -

संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

काय आहे घटना

शनिवारी रात्री अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. कामावर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर दिसून आला. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवले गेले. मात्र तरीही धुर मोठ्या प्रमाणात होता.

७ बालकांना वाचवण्यात यश

या विभागामध्ये आऊट बोर्न आणि इन बोर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बोर्न मधील असलेले सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बोर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आग लागली तेव्हा रूग्णालयात अन्य रूग्ण ही मोठ्या प्रमामात होते. त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे ही जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आग नक्की कशामुळे लागली याबाबत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले

सरकार दु:खात सहभागी आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. धुर मोठ्या प्रमाणात होता. यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात जाता येत नव्हते. दुसऱ्या दरवाज्याने ते आत गेले. यामुळे लगतच्या वॉर्डात असलेल्या ७ बालकांना वाचवण्यात यश आले. या घटनेत १० बालकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही या प्रकरणाची निश्चित गंभीर दखल घेऊन, चौकशी करू. पुन्हा अशा घटना होणार नाहीत याची देखील काळजी घेऊ. मी सद्या पुण्यात आहे. काही तासात घटनास्थळी जाऊन पाहणी करणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.