मुंबई: आपल्या राज्यपालाच्या कारकिर्दीत नेहमीच चर्चेत राहिलेले महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी भगतसिंह कोश्यारी यांना शिवाजी महाराजांची प्रतिकृती भेट दिली. तर ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर मागच्याच आठवड्यात निकाल आल्यानंतर, त्या निकाला दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांचे निर्णय चुकीचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. राज्यपालांचे कार्य हे संविधानाला अनुसरून नव्हतेच, त्याचप्रमाणे राज्यपाल यांनी राजकीय क्षेत्रात उतरण्याचा व पक्षांतर्गत वादात भूमिका बजावण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे ही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोणत्याही पक्षात पेच निर्माण झाला तरी राज्यपालांनी राजकीय क्षेत्रात उतरता कामा नये, हे राज्यघटनेतील तरतुदींना अभिप्रेत नसल्याचे सांगत, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गंभीर निरीक्षण सुद्धा नोंदवले आहे.
इतिहासातील सर्वात चर्चेत राहिलेले: राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द महाराष्ट्रात वादाचीच राहिली होती. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यात राज्यपालांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. याच कारणामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात चर्चेत राहिलेले असे हे राज्यपाल ठरले आहेत.
राजकीय मुद्द्यांपासून सध्या दूर : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा राज्यपालांची भूमिका चुकीचीच असल्याचे म्हटले आहे. तर मी पदावरून मुक्त होऊन तीन महिने झाले आहेत. राजकीय मुद्द्यांपासून सध्या मी दूर राहतो. न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. तसेच बहुमत चाचणीचा निर्णय तेव्हा चुकीचा होता. तर आता त्याच्याशी काय करायचे. मला कायदा माहित नाही. मला फक्त संसदीय परंपरा माहित आहे. राजीनामा आल्यानंतर मला जे योग्य वाटले तशी भूमिका मी विचारपूर्वक घेतली, असेही तत्कालीन राज्यपाल कोश्यारी कोश्यारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली होती.
हेही वाचा-
- Maharashtra Political Crisis सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर भगतसिंह कोश्यारींचा माध्यमांनाच खोचक प्रश्न म्हणाले
- Bhagat Singh Koshyari कोश्यारींनी राज्यपालपदाचा राजीनामा का दिला घरी गेले अन् सगळंच सांगितलं म्हणाले आम्हाला तर सवयच
- Thackeray group on Bhagat Singh Koshyari भगतसिंह कोश्यारींनी गोपनीयतेचा केला भंग ठाकरे गटाकडून राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी