ETV Bharat / state

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल - new governer maharastra

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भगत सिंह कोश्यारी
author img

By

Published : Sep 1, 2019, 11:34 AM IST

Updated : Sep 1, 2019, 12:16 PM IST

मुंबई - भाजपचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यासागर राव यांनी 2014 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता या पदी कोश्यारी यांची निवड करण्यात आली आहे.

  • Kalraj Mishra, Governor of Himachal is transferred & appointed as Governor of Rajasthan. Bhagat Singh Koshyari appointed as Governor of Maharashtra, Bandaru Dattatreya as Governor of Himachal, Arif Mohammed Khan as Guv of Kerala, Tamilisai Soundararajan as Governor of Telangana pic.twitter.com/oKOe8xUOOz

    — ANI (@ANI) September 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्रासह राष्ट्रपतींनी ५ इतर राज्याच्या राज्यपालांचीही नियुक्ती केली आहे. केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आणि तेलंगणा राज्याच्या राज्यापालांची घोषणा करण्यात आली.

भगत सिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर त्यांनी राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला होता. २००१ ते २००२ साली त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पद भुषवले आहे. तर २००२ ते २००७ दरम्यान ते उत्तराखंड विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते. २००८ ते २०१४ साली ते राज्यसभा सदस्य होते.

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बंडारु दत्तात्रय यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरीफ मोहम्मद खान यांची केरळच्या राज्यपालपदी तर तमिलीसाई सौंदराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यासागर राव यांनी २०१४ मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर कोश्यारी यांची निवड करण्यात आली.

Intro:Body:

NAT

Conclusion:
Last Updated : Sep 1, 2019, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.