ETV Bharat / state

बेस्टतर्फे वीजग्राहकांसाठी गो डिजीटल आणि गो ग्रीन उपकम, ग्राहकांना मिळणार सूट - बेस्ट बातमी

बेस्ट उपक्रमाकडून मुंबईकराना वीज आणि परिवहन सेवा दिली जाते. बेस्टच्या वीज ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी बेस्टने 'डिजीटल पेमेंट डिस्काऊंट' व 'गो ग्रीन', असे दोन उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमानुसार डिजिटल बिल भरणाऱ्या ग्राहकांना सूट दिली जाणार आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 25, 2021, 12:43 AM IST

मुंबई - बेस्ट उपक्रमाकडून मुंबईकराना वीज आणि परिवहन सेवा दिली जाते. बेस्टच्या वीज ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी बेस्टने 'डिजीटल पेमेंट डिस्काऊंट' व 'गो ग्रीन', असे दोन उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमानुसार डिजिटल बिल भरणाऱ्या ग्राहकांना सूट दिली जाणार आहे. तसेच हवा आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी अधिकाधिक इलेक्ट्रिक गाड्या चालवण्यात येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी दिली.

ग्राहकांना सवलत

बेस्टच्या वीज ग्राहकांना वीजदेयके त्यांच्या सोयीनुसार भरता यावीत यासाठी बेस्टतर्फे miBEST हे ॲप, www.bestundertaking.net ही वेबसाईट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड व डेबीट कार्ड तसेच इतर बँकींग ॲप, पेटीएम, भीम ॲप, गुगल पे, ॲमेझॉन पे वगैरे सारख्या इतर माध्यमांद्वारे वीजदेयके भरण्यासाठी डिजिटल पेमेंट भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 'बेस्ट' उपक्रमात ऑनलाइन पेमेंट केल्यास एकूण वीजदेयकाच्या रकमेच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपयेपर्यंत सवलत आहे. तसेच ई-बिल्स पर्याय निवडलेल्या गाहकांना प्रतिवर्ष रूपये १२० रूपये सवलत दिली जाणार आहे.

आकर्षक बक्षिस

याशिवाय बेस्ट उपक्रम ग्राहकांना त्यांच्या मासिक वीजदेयके भरणा कराणाऱ्या तारखेअगोदर भरणा केल्यास त्यांना १ टक्के सूटही देत आहे. ऑनलाइन पेमेंट पद्धतीद्वारे नियमितपणे वीजदेयके भरणा करणाऱ्या आणि सलग १ वर्षाच्या कालावधीसाठी ई-बिलाची निवड करणाऱ्या गाहकांसाठी लवकरच विशेष प्रोत्साहन योजना घेऊन येत आहे. लॉटरीद्वारे विजेते ग्राहक निवडून त्यांना आकर्षक बक्षिसांनी सन्मानित करण्यात येईल, असे महाव्यवस्थाप चंद्रा यांनी सांगितले.

इलेक्ट्रिक बसगाड्या

बेस्ट उपक्रमाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा व सवलतीचा ग्राहक लाभ घेतील, तसेच 'पर्यावरण बचाव चळवळीचा' भाग असतील, असे लोकेश चंद्रा म्हणाले. हवा आणि ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी तसेच येणाऱ्या काळात प्रवाशांना उत्तम सेवेचा अनुभव देण्यासाठी बेस्ट उपक्रमामार्फत अधिकाधिक इलेक्ट्रिक बसगाड्या मुंबई शहरात चालविण्यात येतील, अशी माहिती चंद्रा यांनी दिली.

हेही वाचा - अकरावी प्रवेशासाठी होणार सीईटी परीक्षा; शालेय शिक्षण विभागाने घेतला निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.