ETV Bharat / state

४०६ कोटींचे कर्ज नको अनुदान द्या, मुंबई बेस्टची मागणी - मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल

'मुंबई महानगरपालिकेकडून बेस्टला ४०६ कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे. हे ४०६ कोटी रुपये कर्ज न देता अनुदान द्यावे, यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेणार आहे', अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी दिली.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Jun 25, 2021, 10:04 PM IST

मुंबई - 'बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे पालिकेकडून बेस्टला ४०६ कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे. हे ४०६ कोटी रुपये कर्ज न देता अनुदान द्यावे, असा ठराव बेस्ट समितीच्या बैठकीत तीन महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आला. परंतु, पालिका आयुक्तांनी याबाबत अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेणार आहे', अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी दिली.

४०६ कोटींचे कर्ज -

बेस्ट उपक्रमावर अडिच हजार कोटींचे कर्ज आहे. तर अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तूट आहे. पालिकेने बेस्टला २१०० कोटींचे अनुदान दिले आहे. आता पालिका बेस्टला आणखी ४०६ कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. बेस्टला हे कर्ज फेडताना पालिकेला वर्षाला ५० कोटी रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहे. बेस्ट हा पालिकेचा अंगीकृत उपक्रम आहे. यामुळे ४०६ कोटी रुपये कर्ज म्हणून न देता अनुदान म्हणून द्यावेत, असा ठराव बेस्ट समितीत तीन महिन्यांपूर्वी करण्यात आला होता.

भेट घेऊन प्रश्न सोडवा -

'बेस्ट समितीने ठराव करून पालिकेकडे पाठवला. पण पालिकेने त्याची दखल घेतलेली नाही. बेस्ट समिती अध्यक्ष, महाव्यवस्थापक यांनी महापौर किशोरी पेडणेकर तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घ्यावी. यावेळी अनुदानासाठी चर्चा करून प्रश्न निकाली काढावा', अशी सूचना बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी शुक्रवारी (25 जून) झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत केली.

५ हजार कर्मचारी सेवानिवृत्त -

'बेस्ट उपक्रमातील ५ हजार कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. ग्रॅज्युटीचे पैसे त्यांच्या हक्काचे आहेत. त्यामुळे त्यांना पैसे देण्यासाठी पालिका प्रशासनाने अनुदान द्यावे', अशी मागणी गणाचार्य यांनी केली आहे. गणाचार्य यांच्या सूचनेनुसार महापौर व पालिका आयुक्त यांची लवकरच भेट घेणार असल्याचे चेंबूरकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवड : कोयता घेऊन फोटो काढणे पडले महागात; आरोपीला ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.