ETV Bharat / state

BEST Bus Strike : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सातव्या दिवशीही तोडगा नाही, जाणून घ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या - Best contract workers strike latest news

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशी देखील सुरूच आहे. या आंदोलनाची झळ मुंबईकरांना बसत आहे. आज दुपारनंतर बेस्ट कर्मचारी संघटना त्यांची भूमिका जाहीर करणार आहे.

Best contract workers strike continues
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप
author img

By

Published : Aug 8, 2023, 9:38 AM IST

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

मुंबई : बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे बेमुदत आंदोलन आज सलग सातव्या दिवशी देखील सुरूच आहे. कामाला जाणाऱ्या मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील 20 आगरांमधील भाडेतत्त्वावरील 1671 पैकी तब्बल 1375 बस सेवा बंद आहेत. अशा परिस्थितीत मागील 6 दिवसात आंदोलनाच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघालेला नाही. सोमवारी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या कंत्राटी कामगारांच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत देखील कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Best contract workers strike continues
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप

बैठकीत कोणताही तोडगा नाही : 2 ऑगस्टपासून सुरू झालेला हा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापदेखील मागे घेण्यात आला नाही. याचा फटका मुंबईकरांना बसत आहे. या संदर्भात शनिवारी 5 ऑगस्ट रोजी बेस्ट प्रशासनाने या कंत्राटी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत देखील कोणताही तोडगा निघाला नव्हता. सोमवारी 7 ऑगस्ट रोजी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतल्याला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठकीत देखील कोणताही तोडगा नाही. त्यामुळे हा संप यापुढे देखील असाच सुरू राहणार असल्याची माहिती बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या : आम्ही देखील बेस्टच्या कायमस्वरूपी सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करतो. त्यामुळे आम्हालासुद्धा त्यांच्याप्रमाणेच वेतन देण्यात यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. समान काम, समान वेतनासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा पुरवते, त्या देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेस्टमध्ये विलनीकरण करण्यात यावे, अशा संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या : प्रतीक्षानगर आगार येथे वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचारी विशाखा यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना म्हटले की, आमच्यामुळे मुंबईकरांना जो त्रास होत आहे, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, आमच्या देखील काही समस्या आहेत. त्या मुंबईकरांनी समजून घेतल्या पाहिजेत. आम्हाला पुरेसे वेतन दिले जात नाही. बारा ते पंधरा हजारामध्ये घर चालवावे लागते. त्यात आम्हाला कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीत. आजारपणात एखादा दिवस सुट्टी झाली, तर त्याचे देखील पैसे कापले जातात. अशावेळी आम्ही काय करायचे? त्यामुळे संप हा एकमेव मार्ग आमच्याकडे आहे.

कंत्राटदार कंपन्यांची नोटीस : या संपकरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंत्राटदार कंपन्यांनी आता सेवेत रुजू होण्यासाठी नोटीस पाठविल्या आहेत. अचानक पुकारलेल्या बेमुदत संपामुळे कंपनीची बदनामी होत आहे. याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. लवकरात लवकर पुन्हा सेवेत रुजू न झाल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, असे या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये कंत्राटदार कंपन्यांनी म्हटले आहे. कंपन्यांनी पाठवलेल्या पत्रामुळे कर्मचारी अधिकच आक्रमक झाले आहेत. ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वाट पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच संपाची पुढील दिशा आम्ही जाहीर करू, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता या संपात पुढे नेमके काय होते, हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अवलंबून आहे.

हेही वाचा :

  1. Best Bus Employees Strike : बेस्ट कंत्राटी कामगारांच्या संपाचा आज तिसरा दिवस; संपामुळे चाकरमान्यांना फटका
  2. Best Bus in Mumbai : बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा संप सुरुच; तर सेवा सुरळीत करणार, पालकमंत्र्यांची माहिती
  3. Mumbai Best Bus: मुंबईत प्रथमच सत्र न्यायालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बेस्ट बस सेवा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.