ETV Bharat / state

उपनगरात बेस्ट बसला लावण्यात आल्या लोखंडी जाळ्या; बेस्टला नुकसानीची धास्ती

उद्या सकाळी राज ठाकरे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात पोहचतील. त्या दरम्यान काही उत्साही कार्यकर्त्यांकडून शहर व उपनगरात अनुचित प्रकार घडवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बेस्ट प्रशासनाने उपनगरातील काही बसेसला लोखंडी जाळ्या लावून रस्त्यावर उतरविले आहे.

उपनगरात बेस्ट बसला लावण्यात आल्या लोखंडी जाळ्या
author img

By

Published : Aug 21, 2019, 9:37 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यांना २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यामुळे राज्यातील व मुंबई शहर उपनगरातील मनसे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडून नये यासाठी बेस्ट प्रशासनाने आज काही बसेसला लोखंडी जाळी लावून रस्त्यावर उतरवले आहे.

उपनगरात बेस्ट बसला लावण्यात आल्या लोखंडी जाळ्या

उद्या सकाळी राज ठाकरे ईडी कार्यालयात पोहचतील. त्या दरम्यान काही उत्साही कार्यकर्त्यांकडून शहर व उपनगरात अनुचित प्रकार घडवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आज प्रशासनाकडून खबरदारी म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांना १४९ अंतर्गत नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. तर काही कार्यकर्त्यांची धरपकड करण्याची तयारी देखील पोलिसांनी सुरु केली आहे. नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई केली जाईल, असे देखील पोलिसांनी या नोटीसमध्ये सांगितले आहे.

यावेळी शहर प्रशासनाप्रमाणेच बेस्ट प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून उपनगरातील काही बसेसला लोखंडी जाळ्या लावून रस्त्यावर उतरविले आहे. घाटकोपर पूर्व बेस्ट थांब्यावरून चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, माहुलकडे जाणाऱ्या बसेसला लोखंडी जाळ्या बसविल्याचे दिसून आले आहे.

Intro:

राज ठाकरे ईडी प्रकरण बेस्ट बसला उपनगरात लोखंडी जाळ्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवत 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील व मुंबई शहर उपनगरातील मनसे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यामुळे कार्यकर्ते आक्रमक होऊन कोणताही अनुचित प्रकार घडून बेस्टचे नुकसान होऊ नये याकरीता बेस्ट प्रशासनाने आज काही बसेसला लोखंडी जाळी लावून रस्त्यावर उतरवले आहेBody:

राज ठाकरे ईडी प्रकरण बेस्ट बसला उपनगरात लोखंडी जाळ्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवत 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील व मुंबई शहर उपनगरातील मनसे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यामुळे कार्यकर्ते आक्रमक होऊन कोणताही अनुचित प्रकार घडून बेस्टचे नुकसान होऊ नये याकरीता बेस्ट प्रशासनाने आज काही बसेसला लोखंडी जाळी लावून रस्त्यावर उतरवले आहे.

उद्या राज ठाकरे ईडी कार्यालयात सकाळी पोहचतील त्यादरम्यान काही उत्साही कार्यकर्त्याकडून शहर व उपनगरात कोणताही अनुचित प्रकार घडवण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने आज प्रशासनाकडून खबरदारी म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांना 149 अंतर्गत नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. तर काही कार्यकर्त्यांची धरपकड करण्याची तयारीही पोलिसांनी सुरु केली आहे. नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई केली जाईल, असे देखील पोलिसांनी या नोटीसमध्ये सांगितले आहे.

यादरम्यान राज ठाकरे ईडी कार्यालयात उद्या पोहचतील त्यावेळी शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊन शासकीय मालमतेचे नुकसान होऊ नये याकरिता बेस्ट प्रशासनाने आजच उपनगरात काही बसेस लोखंडी जाळ्या लावून उतरवले आहे.घाटकोपर पूर्व बेस्ट थांब्यावरून चेंबूर,मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, माहुल,कडे जाणाऱ्या बसेसला लोखंडी जाळ्या बसवले असल्याचे दिसून येत. त्यामुळे उद्या कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याकरिता बेस्ट बसेसच्या सुरक्षेसाठी जाळ्या लावण्यात आल्या आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.