ETV Bharat / state

बेस्ट मुंबईकरांचा प्रवास गारेगार करणार, ४०० एसी बसेस घेण्याचा प्रस्ताव मंजूर - BEST

पालिकेच्या सूचनांनुसार बेस्टने बसचे ५ किलोमीटरपर्यंत ५ रुपये तर एसी बसचे ६ रुपये भाडे केले. ही दरकपात आज सकाळपासून लागू झाल्यावर प्रवाशांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. त्यामुळे आता बसेसच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फाईल फोटो
author img

By

Published : Jul 9, 2019, 7:47 PM IST

मुंबई - आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने तिकीट दर कमी करून मुंबईकरांना दिलासा दिला आहे. भाडे कपातीनंतर प्रवाशांची संख्या वाढल्याने आजच ४०० एसी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यामुळे येत्या काळात मुंबईकरांना बेस्टच्या गारेगार बसमधून प्रवास करायला मिळणार आहे. पालिकेच्या या निर्णयाचे सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्षांनी स्वागत केले आहे.

महापालिकेच्या निर्यणाबद्दल माहिती देताना पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा

बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. आर्थिक संकटातून बेस्टला बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने काही सुधारणा सुचवल्या होत्या. यामध्ये भाडे दरात कपात करण्याचा तसेच भाडेतत्वावर बसेस घेण्याच्या सूचनांचा समावेश आहे. पालिकेच्या सूचनांनुसार बेस्टने बसचे ५ किलोमीटरपर्यंत ५ रुपये तर एसी बसचे ६ रुपये भाडे केले. ही दरकपात आज सकाळपासून लागू झाल्यावर प्रवाशांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी शेअर रिक्षा आणि टॅक्सीने जाणारे प्रवाशी आज बेस्ट बसने प्रवास करताना दिसत होते. दर कपातीमुळे प्रवाशी खुश असतानाच बेस्टने प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना चांगल्या बसेस मिळाव्यात यासाठी एक ते दीड वर्षांपूर्वी ४५० मिनी आणि मिडी बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो प्रस्ताव बेस्ट समितीने फेटाळला होता. आज पुन्हा याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता बेस्ट समितीने ४०० मिनी एसी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या बसेसपैकी २०० बसेस ऑगस्टमध्ये तर २०० बसेस नोव्हेंबरमध्ये बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

बेस्टच्या तिकीट दरात कपात केल्यानंतर प्रवाशांना बसची वाट पाहावी लागत होती. यामुळे आज ४०० एसी बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बसेस शनिवार आणि रविवारी चालवल्या जाणार नव्हत्या. हे योग्य नसल्याने शनिवारी, रविवारीही चालवाव्यात तसेच बेस्टमधून निवृत्त झालेले, गंभीर गुन्हे नसताना कामावरून काढलेले ड्रायव्हर या बसेसवर कामावर ठेवावेत अशा सूचनादेखील मांडल्या होत्या. त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली. प्रवाशांना चांगल्या सुविधा देताना बेस्टची सेवाही चांगली झाली पाहिजे. ५ रुपये आणि ६ रुपये तिकीट केल्यावर मुंबईकरांचा आनंद वाढला. मात्र, त्यामध्ये आणखी भर पडावी म्हणून आज ४०० एसी बसेसचा निर्णय घेतला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

यांच्याकडून घेतल्या जाणार बसेस -
अँटोनी गॅरेज आणि श्री कृपा सर्व्हिसेस या दोन पुरवठादारांकडून प्रत्येकी २०० बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी बेस्ट दोन्ही पुरवठादारांना पुढील सात वर्षांसाठी ५८७ कोटी ४९ लाख ६० हजार इतके रक्कम अदा करणार आहे.

Intro:मुंबई
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने आपले तिकीट दर कमी करून मुंबईकरांना दिलासा दिला आहे. भाडे कपातीनंतर प्रवाशांची संख्या वाढल्याने आजच ४०० एसी बसेस भाडेततत्वावर घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीने घेतला आहे. यामुळे येत्या काळात मुंबईकरांना बेस्टच्या बसमधून गारेगार प्रवास करायला मिळणार आहे. या निर्णयाचे सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्षांनी स्वागत केले आहे. Body:बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. आर्थिक संकटातून बेस्टला बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने काही सुधारणा सुचवल्या होत्या. यात भाडे दर कपात करण्याचा तसेच भाडेतत्वावर बसेस घेण्याच्या सूचनांचा समावेश आहे. पालिकेच्या सूचनांनुसार बेस्टने बसचे ५ किलोमीटरपर्यंत ५ रुपये तर एसी बसचे ६ रुपये भाडे केले. ही दरकपात आज सकाळपासून लागू झाल्यावर प्रवाशांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी शेअर रिक्षा आणि टॅक्सीने जाणारे प्रवासी आज बेस्ट बसने प्रवास करताना दिसत होते. दर कपातीमुळे प्रवासी खुश असतानाच बेस्टने प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना चांगल्या बसेस मिळाव्यात म्हणून एक ते दिड वर्षांपूर्वी ४५० मिनी आणि मिडी बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो प्रस्ताव बेस्ट समितीने फेटाळला होता. आज पुन्हा याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता बेस्ट समितीने ४०० मिनी एसी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या बसेस पैकी २०० बसेस ऑगस्टमध्ये तर २०० बसेस नोव्हेंबरमध्ये बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

आज बेस्टच्या तिकीट दरात कपात केल्यानंतर प्रवाशांना बसची वाट पाहावी लागत होती. यामुळे आज ४०० एसी बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बसेस शनिवार आणि रविवारी चालवल्या जाणार नव्हत्या. हे योग्य नसल्याने शनिवारी, रविवारीही चालवाव्यात तसेच बेस्टमधून निवृत्त झालेले, गंभीर गुन्हे नसताना कामावरून काढलेले ड्राइव्हर या बसेसवर कामावर ठेवावेत अशा उपसूचना मांडल्या त्याला मंजुरी मिळातयाची माहिती विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली. तर प्रवाशांना चांगल्या सुविधा देताना बेस्टची सेवाही चांगली झाली पाहिजे, बेस्ट जगली पाहिजे त्यानुसार निर्णय घेतले जात आहेत. ५ रुपये आणि ६ रुपाये तिकीट केल्यावर मुंबईकरांचा आनंद आणखी वाढवावा म्हणून आज ४०० एसी बसेसचा निर्णय घेतला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

यांच्याकडून घेतल्या जाणार बसेस -
अँटोनी गॅरेज आणि श्री कृपा सर्व्हिसेस या दोन पुरवठादारांकडून प्रत्येकी २०० बसेस भाडेतत्वावर घेतल्या जाणारा आहेत. त्यासाठी बेस्ट दोन्ही पुरवठादारांना पुढील सात वर्षांसाठी ५८७ कोटी ४९ लाख ६० हजार इतके रक्कम अदा करणार आहे.

रवी राजा व यशवंत जाधव यांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.