मुंबई - महाराष्ट्राचे बेळगाव समिती मधील मंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) , शंभुराज देसाई ( Shambhuraj Desai ) हे बेळगावात दौऱ्यावर जाणार होते. मात्र हा दौरा अचानक स्थगित करण्यात आला ( Shambhuraj Desai Belgaum tour cancelled ) आहे.
बेळगावत जाणारच - शंभूराज देसाई - महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ( Minister of State for Home Shambhuraj Desai ) यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की बेळगावच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत निषेधार्ह आहे. कुणीही कुणालाही कुठेही जाण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून त्यांना रोखता येणार नाही. मात्र, आम्ही जिथे गेल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.
दौरा स्थगित - यासाठी आम्ही सध्या हा दौरा स्थगित केला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्हाला बोलावण्यात आलं होतं. त्यानिमित्त आम्ही जाणार होतो मात्र, अद्याप दौरा रद्द केलेला नाही यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज निर्णय घेतील त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेत नाराजी - बेळगाव येथील मराठी माणसाला बळ देण्यासाठी, नैतिक ताकद देण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावच्या जनतेच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. जर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी हा दौरा रद्द केला, तर बेळगाव येथील जनतेला महाराष्ट्र आपल्या पाठीशी नाही असे वाटेल. त्यामुळे हा दौरा रद्द करू नये. दौरा रद्द झाल्यामुळे सध्या जनतेत नाराजी आहे अशी प्रतिक्रिया बेळगाव मराठी युवा मंच सचिव सुरज कनबरकर यांनी व्यक्त केली आहे.