ETV Bharat / state

BJP March On Beer Bar : नो लीकर झोनमध्येच बियरबारला परवानगी; खारघरमध्ये भाजपचा बारवर मोर्चा - नो लीकर झोन

प्रशासनाने खारघरमध्ये नो लीकर झोनमध्येच (No Liquor Zone) एका बिअरबारला परवानगी (Beer Bar Allowed) दिली. या विरोधात भाजपने या हॉटेल अँड बारवर मोर्चा (BJP march on Beer bar Kharghar Mumbai) काढला तसेच धरणे आंदोलन केले आहे. हा बार कायमचा बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली. Latest news from Mumbai, Mumbai Update

BJP March On Beer Bar
बिअर बारसमोर भाजपचे आंदोलन
author img

By

Published : Nov 20, 2022, 4:22 PM IST

नवी मुंबई : राज्यातील अवैध दारु व्यवसाय (Illegal Liquor Business) थांबता थांबत नसताना तिकडे खारघरमध्ये मात्र नो लीकर झोनमध्येच (No Liquor Zone) एका बिअरबारला परवानगी (Beer Bar Allowed) दिली असल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपने या हॉटेल अँड बारवर मोर्चा (BJP march on Beer bar Kharghar Mumbai) काढला तसेच धरणे आंदोलन केले आहे. निरसूख पॅलेस असे या बारचे नाव आहे. यावेळी भाजपने हा बार कायमचा बंद करण्याची मागणी केली. Latest news from Mumbai, Mumbai Update

बिअर बारसमोर भाजपचे आंदोलन

बारविरोधात एल्गार - विद्यानगरी असलेल्या खारघराला मद्यनगरी बनवण्याचा आघाडी सरकारचा घाट होता आणि म्हणूनच महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना या बारला परवानगी दिली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. नो लीकर झोन असताना देखील खारघरमध्ये बारला परवानगी मिळालीच कशी असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. खारघर शहर नो लीकर झोन असावे अशी नागरिकांची ईच्छा असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारला परवानगी दिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खारघर शहरात 60 हून अधिक शाळा महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आहेत. अख्या देशभरातून मुले खारघरमध्ये शिक्षणासाठी येतात त्यामुळे भाजपने आता या बारविरोधात एल्गार पुकाराला आहे.

नो लीकर झोन घोषित करण्याचा प्रस्ताव- दारूपायी माझा मुलगा, नवरा गेला. सुन, नातवं उघड्यावर आले. त्यामुळे दारू बंदीच करा अशी मागणी ठिकठिकाणी होत असताना नो लीकर झोनमध्ये बारला परवानगी दिल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्यावतीने पनवेल महापालिकेच्या 2017 च्या सर्वसाधारण सभेत खारघर शहर नो लीकर झोन घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. खारघर शहर ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असताना खारघर शहर नो लीकर झोन घोषित करून ठराव प्रारीत करण्यात आला होता. ग्रामपंचायतीचे रुपांतर महापालिकेत होताच खारघर शहरात दारू विक्रीस परवानगी देण्यात येऊ लागली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.