मुंबई - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या निवासस्थानी श्रीगणेशाची उत्साहात प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी अतिशय श्रद्धापूर्वक आणि भक्तीपूर्वक वातावरण तयार झाले होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबदची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली.
गृहमंत्र्यांचे आवाहन -
दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी श्रीगणेशाची अतिशय श्रद्धापूर्वक आणि भक्तीपूर्वक प्रतिष्ठापना झाली. यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा लागत आहे, त्याचे कारण म्हणजे कोरोनाचे संकट संबंध महाराष्ट्र आणि देशावर आहे. म्हणून माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की, आपण गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा. कोरोनाची भीती अजूनही आपल्या सर्वांसमोर आहे. आपण परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करूया की, हे गणराया कोरोनाचे निर्दालन होऊन आमच्या सर्वांचे जीवनामध्ये आनंद निर्माण होण्यासाठी आपले आशीर्वाद लाभूदे, अशी प्रार्थना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बाप्पा चरणी केली.
हेही वाचा - कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह, वातावरण बाप्पामय