ETV Bharat / state

मुंबईत बँक मॅनेजर कोरोना पॉझिटिव्ह, मात्र दिवसभर थांबला बँकेत

author img

By

Published : Mar 18, 2021, 7:26 PM IST

कांदिवली भागातील एका बँकेचा मॅनेजर कोरोना पॉझिटिव्ह आढळला. अखेर या मॅनेजरला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर बँक सील करण्यात आली आहे. मात्र, बुधवारी दिवसभर हा मॅनेजर बँकेत असल्याने तो अनेकांच्या संपर्कात आला होता.

bank-manager-tested-positive-but-he-kept-bank-open-in-mumbai
बँक

मुंबई - कांदिवली भागातील एका बँकेचा मॅनेजर कोरोना पॉझिटिव्ह आढळला. मात्र, तरीही तो दिवसभर बँकेत थांबला आणि बँक सुरूच होती. हा धक्कादायक प्रकार समता नगर पोलीस स्टेशन हद्दीत समोर आली आहे. दिवसभर या बँकेत लोकांचे येणे-जाणे चालूच होते.

प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले -
हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलीस बँकेत पोहोचल्यानंतर सदर मॅनेजरने बँक बंद केली नाही. दिवसभर ग्राहकांची ये-जा सुरू होती. मॅनेजर पॉझिटिव्ह आल्याची माहिती कळताच बँकेतील इतर कर्मचाऱ्यांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

मॅनेजरला रुग्णालयात केले दाखल -

अखेर या मॅनेजरला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर बँक सील करण्यात आली आहे. मात्र, बुधवारी दिवसभर हा मॅनेजर बँकेत असल्याने तो अनेकांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना आणि बँकेत आलेल्या इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह बँक मॅनेजर दिवसभर थांबला बँकेत..

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ -

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे बुधवारी 2, 377 रुग्ण आढळून आले आहेत. तर आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 49 हजार 958 वर पोहचला आहे. कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 547 वर पोहचला आहे. मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. मागील आठवड्यात रोज सरासरी 1,300 ते 1,500 रुग्ण आढळून आले. रविवारी 1,962, सोमवारी 1,712, मंगळवारी 1,922 तर आज बुधवारी 2,377 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा -मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येचा चढता आलेख; बुधवारी 2377 नवे रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.