मुंबई - महाराष्ट्र एटीएसकडून एका बांग्लादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. दिल्ली एअरपोर्टवरून त्याला ताब्यात घेण्यात आले. बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे या बांगलादेशी तरुणाने पासपोर्ट बनवला होता. या आधारावर तो UAE ला जात होता.
महाराष्ट्र एटीएसला मिळालेल्या माहितीच्या आधारे, एटीएस टीम तातडीने मुंबईवरून दिल्लीला गेली आणि एअरपोर्टवरून त्याला अटक केली. इर्शाद शहाबुद्दीन शेख (33) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धर्मांतरण प्रकरणात नाशिकमधून एकाला अटक, यूपी एटीएसची माेठी कारवाई -
बेकायदेशीर धर्मपरिवर्तन केल्याच्या देशपातळीवरील प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने नाशिकमध्ये कारवाई करुन यात सहभागी नाशिकच्या एका तरुणाला अटक केली. या प्रकरणात रविवारी नव्याने तीन जणांना अटक करण्यात आली. गेल्या जूनमध्ये उघड झालेल्या बेकायदेशीर धार्मिक धर्मांतराचे देशव्यापी रॅकेट आणि धर्मांतर करण्यासाठी परदेशातून निधी घेतल्याबद्दलच्या गुन्ह्यात उत्तरप्रदेश दहशतवादविरोधी पथकाने देशपातळीवर कारवाई केली होती.