ETV Bharat / state

व्हिडिओ कॉल करून सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीच्या वांद्रे पोलिसांनी मुसक्या आवळल्या

sextortion अलिकडच्या कालात व्हिडिओ कॉल करुन ब्लॅकमेल करण्याची प्रकरणं वाढत आहे. अशाच एका व्हिडिओ कॉल करून सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीच्या वांद्रे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये तीन जणांना पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे.

sextortion
sextortion
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 9:59 PM IST

मुंबई sextortion : वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तक्रारदारांना 20 ऑक्टोबरला एका महिलेनं नग्न व्हिडिओ कॉल करून त्यानंतर एक मॉर्फ केलेला तक्रारदाराचा अश्लील व्हिडिओ तक्रारदाराच्या व्हाट्सअपवर पाठवला. त्यानंतर पैशांची मागणी करून 41 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने बळकावले. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संविधान कलम 385, 34 आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66(क), 66(ड )आणि 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारे आणखी एका तक्रारदाराकडून सेक्सटॉर्शन करून 20 लाख 5 हजार रुपये लुटल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात भारतीय दांड संविधान कलम 170, 385, 387 आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 क आणि 66 ड अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे.

तीन आरोपींना राजस्थानमधून अटक - या दोन्ही गुन्ह्यांचा तांत्रिक तपास करून वांद्रे पोलिसांनी आरिफ झाकीर खान वय 21 वर्ष जुनेद मामुद्दीन खान वय 25 वर्ष रमण पुरण जाटव वय 44 वर्ष या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही राजस्थान राज्यातील गोपाळगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आहेत. राजस्थान येथून अटक करण्यात आलेल्या या तिन्ही आरोपींकडून पुण्यातील मालमत्तेपैकी एकूण बारा लाख मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. तसंच आरोपींकडून सहा मोबाईल फोन्स आणि 10 विविध कंपनीचे सिम कार्ड्स देखील जप्त करण्यात आले आहेत. तसंच या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पांढरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी दिली आहे.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी - तक्रारदाराचा मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ तक्रारदाराच्या व्हाट्सअपवर पाठवला. त्यानंतर अज्ञात इसमानं तक्रारदारास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन हा व्हिडीओ डिलीट करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील अशी पैशांची मागणी केली. तक्रारदाराने घाबरून 41 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने अज्ञात इसमाला पाठवले होते. याप्रकरणी तक्रारदाराने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक तपासाच्या आधारे तीन आरोपींना राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.