मुंबई : मी कोणावर नाराज आहे, असे कोणी म्हटले? खरतर मला यातील काही माहिती नव्हते. ते काही मला याबाबत कळले आहे ते केवळ माध्यमांतूनच कळले आहे असे म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांची फिरकी घेतली. तसेच, मी नाराज असल्याचे मी कधीच व्यक्त केलेले नाही, असही ते म्हणाले आहेत. काही दिवसांपासून थोरात-पटोले असा वाद सुरू असून थोरात हे पटोले यांच्यावर नाराज आहेत अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे. तसेच, बाळासाहे थोरात यांनी आपल्या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे प्रकरण आणखीनच चिघळले होते. त्या विषयाला अनुसरून पत्रकारांनी थोरात यांना तुम्ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ते अजूनही नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिले आहे.
बाळासाहेबांची आम्ही पुर्णपणे नाराजी दुर केली : काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात अणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात नाराजीनाट्य सुरू आहे. थोरात यांनी आपल्या पक्षनेतेपदाचाही राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी त्यांची नराजी दूर केली. तसेच, बाळासाहेबांची आम्ही पुर्णपणे नाराजी दुर केली आहे. ते येत्या काळात रायपुरमधील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला हजर राहतील. तसेच, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्यासह इतर नेत्यांचीही ते भेट घेणार आहेत अशी माहिती एच के पाटील यांनी पत्रकारांना बोलताना दिली आहे.
महाराष्ट्रातून काय, काय पळवून नेणार ?: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक पुण्यातील भीमाशंकर येथे असून ते महाराष्ट्राचे वैभव आहे. पुरानात त्याची नोंद असल्याने त्यावरून वाद होण्याचे काही कारण नाही, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे एक आहे. आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर प्रश्न उपस्थित केला आहे. सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा त्यांचा दावा त्यांनी केला आहे. त्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर वरिल प्रतिक्रिया दिली आहे. बारा ज्योतिर्लिंग दाखवतो भीमाशंकर हे एक असून त्याचा वाद होण्याचे काही कारण नाही. परंतु, आसाममध्ये नवीनच काय मांडणी झाली आहे. महाराष्ट्रातून काय, काय पळवून न्यायचे याचा विचार सुरू आहे. त्याला विरोध व्हायला हवा. मात्र, ज्यांनी याला विरोध करायला हवा ते शांत आहेत, असा टोला थोरात यांनी यावेळी लगावला आहे. तसेच, भीमशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्राचे वैभव असून पुराणामध्ये या सर्वांची नाेंद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे
दिशाभूल करायचा प्रयत्न : यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल जे पवारांना अनुसरून विधान केले आहे त्यावरही जोरदार निशाना साधला आहे. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर झाला. मात्र, त्यांनी धोका दिला, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. बाळासाहेब थोरात यांनी, देवेंद्र फडणीसांवर यावरून निशाणा साधला. शरद पवार सोबत असते तर सरकार पडले नसते, अशी टीका थोरात यांनी केली हा आहे. हा शपथविधी पवारांच्या सहमतीने झालेला नव्हता. मात्र, मुख्य प्रश्नांना डावलण्यासाठी भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही थोरात यांनी यावेळी केला आहे.
प्रत्येक संघटनेत पत्र व्यवहार सुरू असतो : याचवेळी पत्रकारांनी पटोलेंवर आपण आजुनही नाराज आहेत का ? असा प्रश्न विचारला असता मी कोणावर नाराज आहे हे मला माध्यमांमधूनच कळले असे म्हणत पत्रकारांची फिरकी घेतली. नाशिक पदवीधर पोट निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात नाराज असल्याची चर्चा होती. पक्षश्रेष्ठींना थोरात यांचा पत्र व्यवहार करू नाना पटोले यांच्यासोबत काम करणे कठीण असल्याेच कळवले होते. त्यानंतर प्रभारी एच के पाटील यांनी मुंबईत येऊन थोरात आणि नाना पटोले यांच्या वादावर पडदा टाकण्याचा काम केला. या नाराजीबाबत थोरात त्यांना विचारला असता, माझ्या नाराजीच्या चर्चा मीडियाच्या मार्फत मला कळाल्या. मुळात, मी नाराज नव्हतोच, प्रत्येक संघटनेत पत्र व्यवहार सुरू असतो. त्या पद्धतीने आम्ही देखील केल्याचे थोरात यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा : बीबीसीच्या कार्यालयात 21 तासांनंतरही आयकर विभागाची तपासणी सुरूच.. अमेरिकेने केले मोठे वक्तव्य