मुंबई - चांदीवलीमधील काजूपाडा येथील बाल विकास मित्र मंडळाच्या वतीने, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने गणेश भक्तांना आर्थिक अडचण उध्दभवू नये, यासाठी गणेशोत्सवासाठी मोफत घरगुती गणेश मूर्तींचे वाटप करण्यात येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गणेश भक्तांची रस्त्यावर किंवा कारखान्यात गर्दी होऊ नये, म्हणून बाल विकास मित्र मंडळ यांच्यामार्फत या मंडळाचे पदाधिकारी प्रयाग दिलीप लांडे यांच्याकडून मोफत घरगुती गणेश मूर्ती वितरण घरपोच देत आहेत.
कोरोनामुळे पसरलेल्या जागतिक महामारीचे सावट विघ्नहर्त्याच्या उत्सवावर सुद्धा पडले आहे. एकीकडे सुरक्षेचा प्रश्न तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती ढासळलेली अशा स्थितीत गणरायचे भक्त हा उत्सव साजरा करणार आहेत. गणरायाचे आगमन येत्या काही दिवसांवर आलेले असताना त्याच पार्श्वभूमीवर थेट गणरायाच्या मूर्ती मोफत देण्याचा आगळावेगळा संकल्प मुंबईत राबवला जात आहे.
हेही वाचा - अभिनेता संजय दत्त कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल, केमोथेरपी सुरु होणार असल्याची चर्चा
चांदीवलीमधील काजूपाडा येथील बाल विकास मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने गणेश भक्तांना आर्थिक अडचण उध्दभवू नये, यासाठी गणेशोत्सवासाठी मोफत घरगुती गणेश मूर्तींचे वाटप करण्यात येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गणेश भक्तांची रस्त्यावर किंवा कारखान्यात गर्दी होऊ नये, म्हणून बाल विकास मित्र मंडळामार्फत या मंडळाचे पदाधिकारी प्रयाग दिलीप लांडे यांच्याकडून मोफत घरगुती गणेश मूर्ती वितरण घरपोच देत आहेत.
आजपासून कुर्ला काजूपाडा-सुंदरबाग ह्या विभागातील जनतेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असून आत्तापर्यंत 497 गणेश भक्तांनी आपले नाव नोंदणी केली आहे. या मोफत घरगुती गणेश मुर्ती वितरणाला प्रतिसाद देत आहेत. गणेश भक्तांनीही या उपक्रमाचे स्वागत करत गणरायाचा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्याचा मानस धरला आहे.