ETV Bharat / state

Bail Granted To Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने राज्यभर जल्लोष - Bail granted to Sanjay Raut

खासदार संजय राऊत ( Bail to MP Sanjay Raut ) यांची आज ऑथर रोड तुरुंगातून सुटका करण्यात ( Shiv Sena leader MP Sanjay Raut released from jail ) आली आहे. यामुळे राज्यात विविध ठिकाणी शिवसौनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group ) आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, यवतमाळ इत्यादी ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आंनद व्यक्त केला आहे.

Bail To Sanjay Raut
खासदार संजय राऊत
author img

By

Published : Nov 9, 2022, 10:35 PM IST

यवतमाळ : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची आज ऑथर रोड तुरुंगातून सुटका ( Shiv Sena leader MP Sanjay Raut released from jail ) झाली. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याच अनुषंगाने आज सायंकाळी दत्त चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group ) शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांना ईडी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान शंभर दिवसानंतर संजय राऊत यांना विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर ( Bail to MP Sanjay Raut ) केला दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान यवतमाळच्या दत्त चौक येथे उद्धव गटाचे शिवसेना ( Thackeray group jubilation at Yavatmal Dutt Chowk ) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

यावेळी ढोलताशांचा गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर, महिला शिवसैनिकांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. यावेळी राजेंद्र गायकवाड , संतोष ढवळे, गजानन डोमाळे, प्रवीण पांडे, किशोर इंगळे, संजय रंगे , अतुल उल्हाणे, चेतन सिरसाठ, तुषार देशमुख, कल्पनाताई दरवई, सागर ताई पुरी, मंदाताई गाड़ेकर, विनकरे ताई, कनाके ताई, अमोल धोपेकर, श्रीकांत मिरासे, गिरिजनंद कलंबे, पवन शेंद्रे, कुणाल राडे, बिल्ला सोलंकी, शैलेश गाड़ेकर, सुजीत मूनगिनवार मनीष लोडगे उपस्थित होते.

बीडमध्ये पेढे वाटून आनंद उत्सव साजरा...!

बीड - शिवसेना नेते संजय राऊत यांना आज ईडी कोर्टाने जामीन मंजूर करण्यात आला आहे. बीडमध्ये शिवसेनेकडून पेढे वाटून तसेच फटाके फोडून टायगर इज बॅकच्या घोषणा देत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनी या आनंदोत्सवामध्ये सहभाग घेतला.

MP Sanjay Raut Granted Bail : संजय राऊत यांना जामीन मिळताच पुण्यात जल्लोष

पुणे : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन ( MP Sanjay Raut granted bail ) मिळाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये एक उत्साहात ( Jubilation in Pune after Sanjay Raut got bail ) तयार झालेला आहे. पुण्यामध्ये शिवसैनिकाकडून मोठा जल्लोष करण्यात आला आहे. पेढे वाटून फटाके वाजवून जयघोष करीत जल्लोष केलेला आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता आमचा विजय झाला अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसैनिकांनी दिलेली आहे.

पिंपरी-चिंचवड - संजय राऊतांची सुटका; पिंपरी-चिंचवडमध्ये 100 किलो पेढे वाटप

शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने कारागृहातून सुटका झाली आहे. यामुळं अवघ्या महाराष्ट्रात शिवसैनिक जल्लोष साजरा करत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील भोसरी विधानसभा दिघी विभागाच्या वतीने शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करत पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आहे. हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिक संतोष वाळके यांनी दिली आहे. स्व: खर्चातून शंभर किलो पेढे नागरिकांना वाटले आहेत.

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने बेड्या ठोकल्या होत्या. त्यांना सीबीआय कोठडीत ठेवण्यात आलं होतं. मात्र, आज त्यांची जामिनावर सुटका झाली असून अवघ्या महराष्ट्रात शिवसैनिकांनी एकच जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. पुण्याच्या मावळमध्ये देखील शिवसैनिकांनी पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील वाहनचालकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. महामार्गावर फटाके फोडण्यात आले. दिघी परिसरात देखील शिवसैनिक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी एकत्र येऊन फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत काय बोलणार याकडे शिवसैनिकांच लक्ष लागले आहे. संजय राऊत यांनी सुटका म्हणजे सत्याचा विजय असल्याचं मत शिवसैनिकांनी व्यक्त केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.