ETV Bharat / state

Koregaon Bhima Riots : भीमा कोरेगाव प्रकरणातील नऊ पैकी एका आरोपीला जामीन मंजूर

भीमा कोरेगाव प्रकरणातील ( Koregaon Bhima Riots ) 9 आरोपींपैकी एका आरोपीला जामीन मिळाला आहे. तर 8 आरोपींचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) नामंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. भीमा कोरेगाव प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज ( Sudha Bharadwaj Bail ) यांना डिफॉल्ट जामीन मंजूर केला.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Dec 1, 2021, 11:09 AM IST

Updated : Dec 1, 2021, 11:46 AM IST

मुंबई - कोरेगाव भीमा दंगल प्रकरण ( Koregaon Bhima Riots ) व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या 9 आरोपींची आज मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) जामीन वर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला असून एका आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून 8 आरोपींना जामीन फेटाळले आहे.

नऊ पैकी एका आरोपीला जामीन मंजूर
नऊ पैकी एका आरोपीला जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी 2018 च्या भीमा कोरेगाव एल्गार परिषद ( Elgar Council ) जाती हिंसाचार प्रकरणात वकील कार्यकर्त्या सुधा भारद्वाज ( Sudha Bharadwaj Bail ) यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर इतर 8 आरोपी सुधीर डवले, डॉ. पी वरावरा राव, रोना विल्सन, अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग, प्रोफेसर शोमा सेन, महेश राऊत, व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांचे जामीन अर्ज फेटाळले आहे. त्यांना जून ते ऑगस्ट 2018 दरम्यान अटक करण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला की पुणे सत्र न्यायालयाला ( Pune Sessions Court ) 2018-19 मध्ये त्यांच्याविरुद्धच्या खटल्याची दखल घेण्याचा अधिकार नाही. बेकायदेशीर कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा आरोप असलेल्या प्रकरणांची सुनावणी करण्याची केवळ एनआयए कायद्यांतर्गत ( NIA laws ) विशेष न्यायालयाला ( Special Court ) परवानगी होती, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. त्यामुळे 2018 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना ( Pune Police ) मुदतवाढ देणारे आली होती त्यानंतर 2019 मध्ये 1,800 पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली होते.

Last Updated : Dec 1, 2021, 11:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.