ETV Bharat / state

बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा पुनर्विकास तत्काळ करावा - गृहनिर्माणमंत्री

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील ज्या घरात वास्तव्य होते. त्या संपूर्ण इमारतीचा विकास म्हाडाने करावा, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Babasaheb's house should be redeveloped immediately says minister jitendra avhad in mumbai
बाबासाहेबांच्या घराचा पुनर्विकास तत्काळ करावा - गृहनिर्माणमंत्री
author img

By

Published : Jan 13, 2020, 11:25 PM IST

मुंबई - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील ज्या घरात वास्तव्य होते. त्या संपूर्ण इमारतीचा विकास म्हाडाने करावा, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची बैठक पार पडली. यावेळी आव्हाड बोलत होते.

राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी गृहनिर्माण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची गरज यावेळी व्यक्त केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रखडलेल्या योजनांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. गोरेगाव सिद्धार्थनगर पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात म्हाडाने उर्वरित काम तत्काळ पूर्ण करावे आणि रहिवाशांचे थकलेले भाडे द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

हेही वाचा - 'संजय राऊतांची चाणक्याच्या नखाशी तरी बरोबरी होईल का?'

या बैठकीला परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब, पर्यटन तसेच राजशिष्टाचार व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री रवींद्र वायकर, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार यांच्यासह म्हाडा, एसआरए, महारेरा, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, धारावी पुनर्वसन प्रकल्प, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Intro:Body:
mh_mum_ambedkar_memorial_mumbai_7204684
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा पुनर्विकास तत्काळ करावा :गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील ज्या घरात वास्तव्य होते त्या संपूर्ण इमारतीचा विकास म्हाडाने करावा असे गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटीलयांनी गृहनिर्माण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची गरज यावेळी व्यक्त केली. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी रखडलेल्या योजनांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. गोरेगाव सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात म्हाडाने उर्वरित काम तत्काळ पूर्ण करावे व रहिवाशांचे थकलेले भाडे द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब, पर्यटन, राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री खा.अरविंद सावंत, माजी मंत्री रवींद्र वायकर, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार यांच्यासह म्हाडा, एसआरए, महारेरा, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, धारावी पुनर्वसन प्रकल्प, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.