मुंबई:- रामदेव बाबा यांच्या पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात आलेल्या 'कोरोनील' औषधाला केंद्राकडून परवानगी देण्यात आली आहे. आता हे औषध कोरोनावरील उपचारासाठी वापरले जाणार आहे. पण त्याआधीच हे औषध वादात अडकले आहे. कुठल्या संशोधनाच्या आधारावर या औषधाला परवानगी दिली? असा सवाल करत आता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने ही परवानगी मागे घेत औषध ही मागे घ्यावे अशी मागणी केंद्राकडे एका पत्राद्वारे केली आहे. रामदेव बाबा, पतंजली आणि केंद जनतेची दिशाभूल करत आहे. ही दिशाभूल त्वरित थांबली नाही तर कायदेशीर लढाई लढू असा इशारा ही आयएमएकडून देण्यात आल्याची माहिती डॉ जयेश लेले, राष्ट्रीय सचिव, आयएमए यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला आहे.
रामदेव बाबाचे 'कोरोनील' औषध वादात! आयएमएचा विरोध
कोरोनीलला जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी असल्याचा पतंजलीचा दावा अखेर खोटा निघाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ट्विट करत आपल्याकडून आतापर्यंत कोविड 19 वरील कोणत्याही पारंपरिक औषधाला परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.