ETV Bharat / state

आजोबा बाबा आमटे यांचा वारसा पुढे चालविणाऱ्या अशा होत्या शीतल आमटे - शितल आमटे आत्महत्या

ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. वयाच्या चाळीशीच्या आत केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च 2016 मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली होती.

आमटे
आमटे
author img

By

Published : Nov 30, 2020, 2:34 PM IST

Updated : Nov 30, 2020, 6:48 PM IST

मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. त्यांना वरोऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे.

Dr Sheetal Amte-karajgi dies by suicide
बाबा आमटे यांच्यासोबत एक क्षण

बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. आपल्या आजोबांचा वारसा पुढे चालवणाऱ्या डॉ. शीतल आमटे यांनी 2003 मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतले. त्यांनी सामाजिक उद्यमता (सोशल आंत्रप्रनरशिप) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. याचबरोबर फायनान्शियल मॅनेजमेंटचेही शिक्षण त्यांनी घेतले आहे. हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजनही त्याच करत होत्या.

Dr Sheetal Amte-karajgi dies by suicide
डॉ. शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या

शीतल आमटे यांनी अभियंता आणि व्यवस्थापन तज्ज्ञ गौतम करजगी यांच्याशी लग्न केले आहे. ते वरोरा येथील महारोगी सेवा समितीचे विश्वस्त आहेत आणि व्यवस्थापन व आनंदवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्प पाहतात. त्यांना एक 5 वर्षांचा मुलगा शार्विल आहे. ते महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन या गावी आहेत.

Dr Sheetal Amte-karajgi dies by suicide
वडील विकास आमटे यांच्यासोबत

अमेरिकेत जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही शीतल यांनी पूर्ण केला. त्यांनी मेडिकल लीडरशिप क्षेत्रात ‘मशाल’ आणि ‘चिराग’ असे दोन कार्यक्रम सुरू केले होते. तसेच अपंगांना रोजगार मिळावा, यासाठी त्यांनी ‘निजबल’ उपक्रम हाती घेतला होता. याचबरोबर आनंदवनला पहिले ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं, हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता.

पुरस्काराने सन्मानीत -

वयाच्या चाळीशीच्या आत केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च 2016मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली होती. तसेच त्यांना इतरही पुरस्कारही मिळाले आहेत.

पुरस्कार दिला परत -

एका दैनिकाने बाबा आमटेंच्या आनंदवनात सारं काही आलबेल नाही, अशी वृत्त दिले होते. पण हे सर्व दावे आनंदवनाचा कारभार पाहणाऱ्या डॉ. शीतल आमटे यांनी फेटाळून लावले होते. तसेच संबधित वृतपत्राने दिलेला पुरस्कार डॉ. शीतल आमटे यांनी परत केला होता.

काही दिवसांपूर्वी केले होते फेसबुक लाइव्ह -

डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासांतच त्यांनी फेसबुक लाइव्ह डिलीट केलं होतं. फेसबुक लाइव्हनंतर चर्चांला ऊत आल्यानंतर आमटे कुटुंबांकडून निवेदन जारी करण्यात आले होते. शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.

आठ तासांपूर्वी केलं होतं 'हे' ट्विट

डॉ. शीतल आमटे यांनी आठ तासांपूर्वी एक कॅनव्हास पेंटिग ट्विट केलं होतं. युद्ध आणि शांतता, असं त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Last Updated : Nov 30, 2020, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.