मुंबई - अवयवदानाबाबत सामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर जे.जे. रुग्णालयातर्फे महा रॅलीचे आयोजन करण्यात आले. मरीन ड्राईव्ह येथील एअर इंडिया इमारतीपासून जे. जे. जिमखान्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली.
हेही वाचा -गणेशोत्सवादरम्यान दादरच्या फुल मार्केटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य
या जनजागृती रॅलीमध्ये जे. जे. रुग्णालय व इतर अनेक महाविद्यालयांतील सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते. पोलीस व अग्निशमन दलाच्या चोख बंदोबस्तात रॅली पार पडली. यावेळी विविध वयोगटातील लोकांनीही एकत्र येत अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले.