ETV Bharat / state

परिवहन सचिवांसोबतची बैठक निष्फळ; रिक्षाचालक मंगळवारपासून बेमुदत संपावर

author img

By

Published : Jul 8, 2019, 5:15 PM IST

मंत्रायलयात परिवहन सचिव यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र, त्यावर कुठलाही तोडगा काढलेला नाही. यामुळे संपाच्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचे रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. मात्र, या संपाला भाजपप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेने विरोध दर्शविला आहे.

फाईल फोटो

मुंबई - रिक्षाचालक संघटनेची परिवहन सचिव यांच्यासोबत मंत्रालयात पार पडलेली बैठक निष्फळ ठरली. यामुळे रिक्षाचालक संघटनेने संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमूख शहरांमधील सर्व रिक्षाचालक उद्या ९ जुलैुपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. परिणामी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत.

भाडेवाढ मिळावी, रिक्षाचालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी मंडळ परिवहन खात्याअंतर्गत असावे, ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा बंद करावी आदी मागण्यांसाठी परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार बैठका झाल्या आहेत. मात्र, सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही. आज देखील मंत्रायलयात परिवहन सचिव यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, त्यावर कुठलाही तोडगा काढलेला नाही. यामुळे संपाच्या निर्णयावर ठाण राहणार असल्याचे रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. मात्र, या संपाला भाजप प्रणित प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेने विरोध दर्शविला आहे.

Intro:मुंबई - विविध मागण्यांसाठी आज मंत्रालयात परिवहन सचिव यांच्यासोबत रिक्षा चालक संघटनेची पार पडलेली बैठक निष्फल ठरली. यामुळे रिक्षा चालक संघटना संपावर ठाम आहेत.
मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमधील रिक्षाचालक उद्या 9 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. मात्र यात उद्या सामान्य प्रवाशांचे मोठया प्रमाणात हाल होणार आहेत.Body:भाडेवाढ मिळावी, रिक्षाचालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी मंडळ परिवहन खात्याअंतर्गत असावे, ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा बंद करावी आदी मागण्यासाठी परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱयांकडे वारंवार बैठका झाल्या आहेत, पण त्या पूर्ण करण्याबाबत सरकार कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. आज पार पडलेल्या बैठकीतही परिवहन सचिव यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, मात्र त्यावर कोणताही तोडगा काढला नाही, यामुळे आम्ही संपावर ठाम असल्याचे रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. Conclusion:मात्र या संपात भाजप प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेने विरोध दर्शविला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.