ETV Bharat / state

कांजूरमार्ग पूर्वेमध्ये झाड कोसळून रिक्षाचे नुकसान; धोकादायक झाडाखाली उभे न राहण्याचे पालिकेचे आवाहन - झाड

कांजूरमार्ग पूर्वेतील हे झाड धोकादायक आहे. गेल्या १० नोव्हेंबरला स्थानिक रहिवाशांनी संबंधीत झाडाची छाटणी करण्यासाठी पालिकेचा एस विभाग आणि स्थानिक आमदार सुनील राऊत यांना निवेदन दिले होते. मात्र, महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले

रिक्षावर कोसळलेले झाड
author img

By

Published : Jun 13, 2019, 1:56 PM IST

मुंबई - कांजुरमार्ग पूर्वतील महर्षी कर्वे नगरमधील एकता इमारतीसमोर बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने झाड कोसळून रिक्षाचे नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

रिक्षावर कोसळलेले झाड

कांजूरमार्ग पूर्वेतील हे झाड धोकादायक आहे. गेल्या १० नोव्हेंबरला स्थानिक रहिवाशांनी संबंधीत झाडाची छाटणी करण्यासाठी पालिकेचा एस विभाग आणि स्थानिक आमदार सुनील राऊत यांना निवेदन दिले होते. मात्र, महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. त्यातच बुधवारी दिवसभर वायू वादळाने मुंबई शहर आणि उपनगरात वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे हे झाड कोसळून झाडाखाली उभ्या असलेल्या रिक्षाचे नुकसान झाले आहे. त्यासाठी महापालिका जबाबदार असल्याचा आरोपी रिक्षा मालक दस्तगीर शेख यांनी केला आहे.

मुंबईत झाड कोसळण्याची घटना नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी चेंबूरला झाड कोसळण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यामध्ये एक महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या घटनेत स्वस्तिक पार्कमध्ये मार्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ महिलेवर झाड कोसळल्याने त्यांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे धोकादायक स्थितीत उभी असलेली झाडे मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी मुंबईत पालिकेने झाडावर पोस्टर्स लावून मुंबईकरांना सूचना दिल्या आहेत. वादळी-वाऱ्यासह पाऊस आल्यास झाडाची फांदी तुटेल किंवा झाड कोसळले. त्यामुळे सावधान राहा. झाडाखाली उभे राहू नका, अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी लावल्याचे दिसून येत आहे.

Intro:कांजुरमार्ग पूर्व महर्षी कर्वे नगर येथे झाड कोसळून रिक्षाचे नुकसान .

कांजुरमार्ग पूर्व महर्षी कर्वे नगर एकता इमारत समोर काल सायंकाळी 6 वाजता आलेल्या वेगाच्या वाऱ्यात जुने झाड कोसळून रिक्षाचे मोठे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. झाड धोकादायक आहे अशी पूर्व माहिती अर्जाद्वारे महानगरपालिका व स्थानिक आमदार यांना रहिवाशांनी 2 वर्षा पूर्वी दिली होती.Body:कांजुरमार्ग पूर्व महर्षी कर्वे नगर येथे झाड कोसळून रिक्षाचे नुकसान .

कांजुरमार्ग पूर्व महर्षी कर्वे नगर एकता इमारत समोर काल सायंकाळी 6 वाजता आलेल्या वेगाच्या वाऱ्यात जुने झाड कोसळून रिक्षाचे मोठे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. झाड धोकादायक आहे अशी पूर्व माहिती अर्जाद्वारे महानगरपालिका व स्थानिक आमदार यांना रहिवाशांनी 2 वर्षा पूर्वी दिली होती.

काल दिवसभर वायू वादळाने मुंबई शहर व उपनगरात वेगाने वारे वाहून कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत होता. तर हवामान खात्याने समुद्रात मच्छीमार व समुद्रकिनारी नागरिकांना जाण्यास मनाई करण्याच्या सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे प्रशासनाने आज दिवसभर मुंबईतील विविध किनाऱ्यावर नागरिकांना पोलीस व महानगरपालिकेने मज्जाव केला होता.या वायू वादळाने मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील होर्डिंगचा काही भाग एका व्यक्तीवर पडून तो या घटनेत मृत झाला तर दुसरीकडे वेगात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बांद्रा येथे हे स्कायवॉकचा पत्रा उडून तीन महिला जखमी झाले वेगाने वाहत असलेल्या वाऱ्या मुळे पश्चिम रेल्वे वर प्रभाव झाला .

कांजूरमार्ग पूर्वेतील हे झाड धोकादायक आहे. त्याची छाटणी करण्यासाठी स्थानिक रहिवाश्यानी 10/11/2017 ला पालिकेच्या एस विभाग व स्थानीक आमदार सुनील राऊत यांना निवेदन दिले होते. यावर कोणतीही कार्यवाही पालिकेच्या मार्फत झाली नाही.झाड तसेच धोकादायक परिस्थितीत होते.मुंबईत झाड कोसळण्याची घटना नवीन नाही चेंबूरला झाड कोसळण्याच्या दोन घटना काही महिन्यांपूर्वी घडल्या यात एक महिला प्रवासी ठार झाली होती .दुसऱ्या घटनेत स्वस्तिक पार्कमध्ये मार्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ महिलेवर माडाचे झाड कोसळल्याने त्यांचाही मृत्यू झाला होता यामुळे धोकादायक स्थितीत उभी असलेली झाडे मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे सामोरे आले आहे.पालिकेने आता आपल्यावरील जबाबदारी झटकत मुंबईत पालिकेने झाडावर पोस्टर्स लावून मुंबईकरांना सूचना केली आहे .मोठा पाऊस आला किंवा जोराचा वादळी वारा आला असेल तर झाडाची फांदी तुटेल किंवा झाड पडण्याची घटना घडेल त्यामुळे सावधान राहा झाडाखाली उभे राहू नका अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी लावल्याचे दिसून येत आहे.

रिक्षा मालक दस्तगिर शेख म्हणाले माझ्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले यास जबाबदार पालिका आहे. आमच्या अर्जावर काय कारवाई केली ते सांगा हे झाड महिला, पुरुष,लहान मुलांवर कोसळून कोणाचा जीव गेला असता त्यावेळी सर्व पंचनामा व तपासणीसाठी आले असते .असा रोष रिक्षा मालक व रहिवाशी असिफ पटेल यांनी यावेळी व्यक्त केला .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.